Goa Chef Sarita Chavhan: कारगिल विजय दिनाच्या मेजवानीला गोमंतकीय हाताची चव; शेफ सरिता चव्हाण यांनी बनवले जेवण

शहिद सैनिकांच्या स्मरणार्थ सेवा, पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहासाठी सुरू केला होता व्यवसाय
Goa Chef Sarita Chavhan
Goa Chef Sarita Chavhangoogle image
Published on
Updated on

Goa Chef Sarita Chavhan at Kargil : पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहासाठी म्हणून आचारी बनलेल्या गोव्यातील सरिता चव्हाण आता कारगिलमध्ये एक दिवस सैनिकांसाठी रूचकर, स्वादिष्ट भोजन बनवतात. 26 जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या मेजवानीतील भोजन बनविण्याची संधी सरिता चव्हाण यांना मिळाली.

शहिद जवानांच्या स्मरणार्थ येथे त्यांनी आचारी म्हणून विनामुल्य सेवा दिली आणि स्वतः बनवलेले रूचकर, स्वादिष्ट भोजन सैनिकांना खाऊ घातले.

सरिता चव्हाण आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी गोवा ते द्रास असा प्रवास केला. सर्वजण द्रासमधील युद्ध स्मारकाजवळ पोहचले. येथेच शहीदांच्या स्मरणार्थ वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

Goa Chef Sarita Chavhan
Fatorda News: नगरसेविकेच्या पतीची भर रस्त्यात नागरीकाला बेदम मारहाण; फातोर्ड्यातील घटना

मेजवानीत हे पदार्थ

चव्हाण यांनी 26 जुलै (कारगिल विजय दिवस) निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये 1000 हून अधिक लोकांना पेस्ट्री आणि पॅन पिझ्झा ते इतर असे अनेक पदार्थ बनवले. नाश्त्यासाठी डालगोना कॉफी आणि गोड डिश म्हणून फिरणी आणि दुपारच्या जेवणासाठी उत्तर भारतीय जेवण तयार केले.

उदरनिर्वाहासाठी व्यवसाय

चव्हाण म्हणाल्या की, लग्नानंतर मी 1980 मध्ये गोव्यात आले. कारण एखादी डिश परिपूर्ण असावी, असा पतीचा आग्रह होता. मग स्वयंपाकाची पुस्तके वाचायला सुरुवात केली. पतीने 1994 मध्ये नोकरी सोडली आणि नंतर आजारपणामुळे ते घरातच बंदिस्त झाले, तेव्हा मला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आचारी म्हणून व्यवसाय करावा लागला.”

सुरवातीला मडगाव, पणजी आणि वास्कोमध्ये घरोघरी जाऊन तयार मसाला पेस्ट विकली. पतीच्या निधनानंतर शेजाऱ्यांसाठी टिफीन बनवायला सुरुवात केली. माझा टिफिन लोकप्रिय ठरला. त्यानंतर कॉर्पोरेट कर्मचार्‍यांसाठी पॅक लंच आणि नंतर मोठ्या कार्यक्रमांमध्ये केटरिंगसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू लागल्या."

Goa Chef Sarita Chavhan
Fatorda News: नगरसेविकेच्या पतीची भर रस्त्यात नागरीकाला बेदम मारहाण; फातोर्ड्यातील घटना

कारगिलमध्ये वैयक्तिक भेटीवेळी युद्ध स्मारकाला गेले तेव्हा विजय दिनानिमित्त स्वयंपाक करण्याची संधी द्यावी, अशी विनंती लष्करी अधिकाऱ्यांना केली. सुरवातीला छोट्या कार्यक्रमांसाठी स्वयंपाक करायला सांगितला गेला.

त्यात यशस्वी झाल्यावर गेल्या वर्षी कार्यक्रमाच्या मुख्य दिवसासाठी स्वयंपाक करण्याची संधी मिळाली आणि आता दरवर्षी ते सुरू ठेवण्याची योजना आहे.

दरम्यान, चव्हाण यांना त्यांच्या सेवेसाठी मोबदला देऊ करण्यात आला होता, परंतु युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. शहिद सैनिकांचे कुटुंबीय दरवर्षी येथे येतात. त्यांना चांगले जेवण देऊन सेवा करणे मला शक्य आहे, असे म्हणत त्या विनामुल्य ही सेवा देतात.

भारतीय लष्कराने 26 जुलै 1999 रोजी 'ऑपरेशन विजय' यशस्वीपणे पूर्ण केले होते. कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकच्या घुसखोरांना पळवून लावले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com