Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

Cule Shigao Emergency Health Centre: यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत रुग्णांना तत्पर, संवेदनशील आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना दिल्या.
Cule Shigao Emergency Health Centr
Dharbandora Health CentreDainik Gomantak
Published on
Updated on

कुळे: धारबांदोडा तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कुळे-शिगाव ग्रामपंचायतीच्या २४x७ आपत्कालीन आरोग्य सेवा केंद्राचे उद्घाटन गोवा विधानसभेचे सभापती तथा सांवर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते झाले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिवस-रात्र तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. उद्घाटनानंतर गावकर यांनी केंद्राची पाहणी करून उपलब्ध वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक उपकरणे, ऑक्सिजन व्यवस्था, रुग्णसेवेची तयारी तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सेवा पद्धतीची माहिती घेतली.

यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत रुग्णांना तत्पर, संवेदनशील आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना दिल्या. गावकर म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे ही काळाची गरज आहे.

Cule Shigao Emergency Health Centr
देशात कुठेही चालणार 'डीडीएसएसवाय'! पहिले डिजिटल आरोग्य राज्य बनण्याचे गोवा सरकारचे लक्ष्य

अपघात किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत पहिल्या काही मिनिटांचे महत्त्व लक्षात घेता हे २४x७ सेवा केंद्र अनेकांसाठी जीवनदायी ठरणार आहे. शासन ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून अशा सुविधा भविष्यातही वाढविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, आरोग्य सेवा संचालनालय आणि ईएमआरआय ग्रीन हेल्थ सर्व्हिसेस यांच्या संयुक्त सहकार्याने हे केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य रुपेश देसाई, मोहन गावकर, सरपंच गोविंद शिगावकर, उपसरपंच नेहा मडकईकर, पंचायत सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, ईएमआरआयचे कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Cule Shigao Emergency Health Centr
ग्लोइंग आणि हेल्दी स्किनसाठी महागडी ट्रीटमेंट नको, घरच्या घरी करा 'हे' 8 उपाय

केंद्राची जबाबदारी पंचायतीवर

या केंद्राची संपूर्ण जबाबदारी कुळे-शिगाव ग्रामपंचायत पाहणार आहे. परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्‍वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com