'त्या' पाच पोलिसांना जेलमध्ये टाका! फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ महासंचालकांच्या दारी; अल्पवयीन मुलासह चौघांना कोठडीत बेदम मारहाण

Custodial Assault Allegations: शिष्टमंडळाने आज सकाळी पोलिस महांसचालकांची भेट घेत काही मागण्या केल्या आणि आपले निवेदन सादर केले.
Custodial Assault Allegations
Custodial Assault AllegationsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाच्या कोठडीत एका अल्पवयीन मुलासह चौघांना मारहाण केल्याप्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी युवक काँग्रेस व काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळाने सोमवारी पोलिस मुख्यालयात महासंचालक आलोक कुमार यांना निवेदन सादर केले.

शिष्टमंडळाने सकाळी पोलिस महांसचालकांची भेट घेत काही मागण्या केल्या आणि आपले निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात ॲड. अमित पालेकर, समील वळवईकर, गोवा प्रदेश युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष अर्चित नाईक, गोवा प्रदेश महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप, महेश म्हांबरे आणि स्थानिक नेते मारेनो रिबेलो यांचा समावेश होता.

Custodial Assault Allegations
Goa Crime: म्हापसा येथील ऑनलाइन क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश; चौघांना अटक, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

पालेकर म्हणाले की, ही घटना ६ जून रोजी मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात घडली. दोन गटांमधील संघर्षानंतर एका अल्पवयीन मुलासह चार जणांना अटक करण्यात आली होती. पोलिस विभागाने या घटनेसाठी जबाबदार धरत पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे; यामध्ये संकेत नाईक आणि गौरव नाईक या दोन पोलिस उपनिरीक्षकांचा, तसेच चेतन कोळी, समीर सुधीर आणि पुंडलिक परीट या तीन शिपायांचा समावेश आहे.

पालेकर म्हणाले की, पोलिस महासंचालकांशी झालेल्या बैठकीत आम्ही त्या पाचही पोलिसांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कारण पीडितांपैकी एक अल्पवयीन आहे. आरोपींविरोधात पोलिसांविरुद्ध ‘गोवा चिल्ड्रन्स ॲक्ट’ आणि ‘पोक्सो ॲक्ट’अंतर्गत गुन्हे दाखल केले जावेत. पोलिस कोठडीत असताना पीडितांना लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

Custodial Assault Allegations
Crime News: मेहुण्यासोबत दारु पिली, अश्लील व्हिडिओ पाहिला अन्..., नशेत धुंद 12 वर्षांच्या मुलाकडून 9 महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार

अध्यक्ष अर्चित नाईक म्हणाले की, जर पोलिस ठाणीच असुरक्षित जागा बनली, तर पक्षाला हे प्रकरण स्वतःच्या हातात घेण्यास भाग पाडले जाईल. पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न करूनही, या विषयावर त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com