Crime News: मेहुण्यासोबत दारु पिली, अश्लील व्हिडिओ पाहिला अन्..., नशेत धुंद 12 वर्षांच्या मुलाकडून 9 महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार

Uttar Pradesh Girl Crime: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गुलरिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला आणि रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना उघडकीस आली.
Uttar Pradesh Girl Crime
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Girl Crime: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गुलरिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला आणि रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना उघडकीस आली. येथे एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मामाने आपल्याच 9 महिन्यांच्या निष्पाप भाचीवर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली. आरोपी मुलाने आधी आपल्या मेव्हण्यासोबत दारु प्राशन केली आणि त्यानंतर तो घरात झोपला. मात्र, मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास तो गुपचूप उठला आणि आपल्या बहिणीच्या कुशीत गाढ झोपलेल्या 9 महिन्यांच्या चिमुरडीला पळवून नेले.

घरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन शेतातील टिन शेडमध्ये तो तिला घेऊन गेला. तिथे त्याने स्वतःच्या मोबाईलवर अश्लील फिल्म पाहिली आणि त्यानंतर या निष्पाप जिवावर पाशवी अत्याचार केला. या अमानुष कृत्यानंतर ती नऊ महिन्यांची चिमुरडी वेदनेने तडपत असतानाही त्या नराधम मामाला जराही दया आली नाही. तो तिला कपड्यांशिवाय, रक्ताळलेल्या आणि बेशुद्ध अवस्थेत त्याच टिन शेडमध्ये सोडून शांतपणे घरी येऊन झोपला.

Uttar Pradesh Girl Crime
Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात वादळ आणि पावसाचे 100 बळी, जनजीवन विस्कळीत; बाधितांना आर्थिक मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

शनिवारी पहाटे जेव्हा गावातील काही लोक शेताकडे निघाले, तेव्हा त्यांना टिन शेडमध्ये एक लहान मुलगी विवस्त्र आणि गंभीर अवस्थेत आढळून आली, तिच्या खाजगी भागातून रक्तस्त्राव होत होता. गावकऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना आणि मुलीच्या कुटुंबीयांना दिली. दरम्यान, रात्री दोन वाजल्यापासून आपली मुलगी बेपत्ता असल्याचे पाहून तिची आई आणि कुटुंबीय रात्रभर तिचा शोध घेत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पीडितेला उपचारासाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने, सध्या त्या निष्पाप मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

Uttar Pradesh Girl Crime
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

एसपी सिटी निमिश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर काही संशयितांची चौकशी सुरु केली. संशयाच्या आधारे जेव्हा पीडित मुलीच्या 12 वर्षीय सख्ख्या मामाला ताब्यात घेऊन कडक चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी मामा काही दिवसांपूर्वीच आपल्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी आला होता. पोलिसांनी (Police) जेव्हा त्याचा मोबाईल जप्त केला, तेव्हा त्यात अनेक अश्लील व्हिडिओ आढळून आले, ज्याचा तपास आता सायबर सेल करत आहे.

Uttar Pradesh Girl Crime
Uttar Pradesh Crime: पुत्रप्राप्तीचा हव्यास! गरोदर पत्नीसोबत पतीचं दुष्कृत्य; कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

याशिवाय त्याच्या फोनमध्ये काही मुलींचे (Girl) नंबरही सापडले असून, यापूर्वी त्याने असे कृत्य अन्य कोणासोबत केले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोक्सो आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com