Goa Crime: म्हापसा येथील ऑनलाइन क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश; चौघांना अटक, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

Online Cricket Betting Raid: गुन्हे शाखेने म्हापसा येथील एकतानगर भागात सुरू असलेल्या ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीच्या अड्ड्यावर छापा टाकून चौघांना रंगेहात अटक केली आहे.
Online Cricket Betting Raid
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गुन्हे शाखेने म्हापसा येथील एकतानगर भागात सुरू असलेल्या ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीच्या अड्ड्यावर छापा टाकून चौघांना रंगेहात अटक केली आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या ‘ट्राय नेशन ए’ क्रिकेट मालिकेतील भारत-अ विरुद्ध श्रीलंका-अ या सामन्यावर हे संशयित ऑनलाईन सट्टा लावत होते.

उमाशंकर जोशी (४२, मध्य प्रदेश), राहुल खोत (२५, हरियाणा), अन्वेश सोनी (३०, मध्य प्रदेश) आणि फैजान शेख (२२, मध्य प्रदेश) यांना अटक केली आहे. २१ जून २०२६ रोजी गुन्हे शाखेला म्हापसा परिसरात ऑनलाईन सट्टेबाजी सुरू असल्याची विश्वासार्ह माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने एकतानगर - म्हापसा येथील एका व्हिलावर छापा टाकला.

Online Cricket Betting Raid
Baga Beach Shack Violence: कन्नड गाणी न लावल्याने धिंगाणा, बागा किनारी शॅकवर मद्यधुंद पर्यटकांकडून तोडफोड

या कारवाईत पोलिसांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून २ लॅपटॉप, ८ मोबाईल फोन, एक राउटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गोवा, दमण आणि दीव सार्वजनिक जुगार कायदा, १९७६ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० आणि २००८ च्या कलम ६६ (सी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस अधीक्षक जीवबा दळवी यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. छापा टाकणाऱ्या पथकात पोलिस निरीक्षक विकास देयकर, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीराम साळगावकर आणि पोलिस कॉन्स्टेबल संदेश वळवईकर, क्रितेश किनळकर, कल्पेश तोरसकर, नितीन गावस, कृष्णा माडकर आणि शशिकांत बाधी यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com