Karnataka Viral Video: 'इडली सांबर अच्छा है, गोवावाला...', कर्नाटकात काँग्रेस आमदार समर्थकांनी घोषणा देताना ओलांडली मर्यादा

भाजपने प्रचारासाठी केंद्रीय नेत्यांसह महाराष्ट्र आणि गोव्यातून नेत्यांची मोठी फौज कर्नाटकत सक्रिय होती.
Karnataka Viral Video
Karnataka Viral VideoDainik Gomantak

Karnataka Viral Video: कर्नाटकमध्ये नुकतेच विधानसभा निवडणूक पार पडली, यात काँग्रेसला 135 जागांवर विजय मिळाला असून, पूर्वी सत्तेत असलेल्या भाजपला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले. कर्नाटकमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली होती.

भाजपने प्रचारासाठी केंद्रीय नेत्यांसह महाराष्ट्र आणि गोव्यातून नेत्यांची मोठी फौज कर्नाटकत सक्रिय होती. दरम्यान, विजयी झालेल्या एका काँग्रेस आमदारांच्या समर्थकांनी गोवा विरोधी घोषणा दिल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

काय आहे व्हिडिओ?

उत्तर कन्नड जिल्ह्यातील हलियाल मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आर. व्हि. देशपांडे यांचा विजय झाला आहे. देशपांडे यांनी भाजप उमेदवार सुनिल हेगडे यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर देशपांडे यांचे समर्थक विजयी जल्लोष करताना दिसत आहेत.

दरम्यान, जल्लोष करताना समर्थकांनी काही घोषणा दिल्या, मात्र घोषणा देताना समर्थकांनी मर्यादा ओलांडत सुरूवातीला, "इडली सांबर अच्छा है, मोदी-शहा लुच्छा है", असे म्हणताना दिसत आहेत. त्यानंतर एक व्यक्ती त्यांना थांबवत 'गोवावाला लुच्छा है' असे म्हणायला सांगतो. व सर्व जमाव "इडली सांबर अच्छा है, गोवावाला लुच्छा है" अशी घोषणा देतात. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Karnataka Viral Video
Viral Video: 'गोवा महिलांसाठी सेफ नाही', बेंगळूरूच्या युवतीने व्यक्त केली चिंता; रेन्ट कॅबची एकाने फोडली काच

येथे पाहा व्हिडिओ

Karnataka Viral Video
Goa Petrol-Diesel Price: काय आहेत गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव? जाणून घ्या एका क्लिकवर

कर्नाटकमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी गोव्यातून राज्यातील मंत्री आणि नेते मंडळीची मोठी फौज तेथे सक्रिय होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह वनमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह विविध नेत्यांनी कर्नाटकमध्ये सभा घेतल्या.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी हलियाल मतदारसंघातून भाजप उमेदवार सुनिल हेगडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला.

Karnataka Viral Video
CM Pramod Sawant : मॉन्सूनसाठी आपत्कालीन व्यवस्थापन पूर्णपणे सज्ज : मुख्यमंत्री

दरम्यान, हेगडे यांच्या पराभवानंतर राणे यांनी हेगडे यांच्या समर्थनात ट्विट केले आहे.

"सुनील हेगडे एक नम्र व्यक्तिमत्व, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा दृष्टीकोन तळागाळात घेऊन जाण्यासाठी आपण एकत्र काम करत राहू. आपला सर्वात मोठा गौरव कधीही अपयशी न होण्यात नाही, तर अपयशी होऊन पुन्हा उठण्यात आहे." असे राणे यांनी हेगडे यांच्या समर्थनात ट्विट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com