Goa Viral Video
Goa Viral Video Dainik Gomantak

Viral Video: 'गोवा महिलांसाठी सेफ नाही', बेंगळूरूच्या युवतीने व्यक्त केली चिंता; रेन्ट कॅबची एकाने फोडली काच

बेंगळूरूच्या युवतीने गोव्यातून एका घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत 'गोवा महिलांसाठी सेफ नाही' अशी खंत व्यक्त केली आहे.
Published on

Goa Viral Video: शिवोली येथे दगड मारून महिला पर्यटकांच्या ‘रेन्ट अ कॅब’ कारची काच फोडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (14 मे रोजी) मध्यरात्री 12.30 च्या सुमारास शिवोली येथील एसएफएक्स विद्यालयाजवळ ही घटना घडली. यानंतर बेंगळूरूच्या रहिवाशी असलेल्या युवती आणि स्थानिक इसम यांच्यात शाब्दिक वाद देखील झाला. त्यानंतर युवतीने एक व्हिडिओ पोस्ट करत 'गोवा महिलांसाठी सेफ नाही' अशी खंत व्यक्त केली आहे.

युवतीने व्हिडिओच्या माध्यमातून तक्रार दिल्यानंतर हणजूण पोलिसांनी संशयित सोमा लक्ष्मण चोडणकर (59, रा. बंदीरवाडा, शापोरा) यास अटक केलीय.

Goa Viral Video
Goa Petrol-Diesel Price: काय आहेत गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव? जाणून घ्या एका क्लिकवर

फिर्यादी प्रीती शेट्टी (बेंगळूरू - कर्नाटक) ही व आणखी एक युवती या ‘रेन्ट अ कॅब’ने हणजूणहून आसगावमार्गे मोरजीकडे आपल्या हॉटेलच्या खोलीवर जात होत्या. यावेळी वाटेत आसगाव येथे फिश पाईंटजवळ फिर्यादींच्या कारच्या टायरमधून दगड संशयित दुचाकीस्वाराच्या अंगावर उसळला. त्यानंतर संशयिताने फिर्यादीच्या कारचा पाठलाग केला. पोलिसांनी संशयिताची ओळख पटवून त्यास अटक केली.

जाब विचारताच दगड मारला

शिवोली येथे वाटेत घटनास्थळी फास्टफुडवर काही खाण्यासाठी फिर्यादींनी गाडी थांबवली होती. तेव्हा संशयिताने सदर पर्यटक युवतींना जाब विचारताच दगड मारून कारची काच फोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com