CM Pramod Sawant : मॉन्सूनसाठी आपत्कालीन व्यवस्थापन पूर्णपणे सज्ज : मुख्यमंत्री

तयारीविषयी अधिकाऱ्यांची बैठक
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

मॉन्सूनपूर्व स्मार्ट सिटीसह इतर सर्व कामे या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश देत आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारीसंदर्भातील बैठक आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली.

मॉन्सून काळात कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाशी संबंधित खाते सज्ज आहे. प्रशिक्षित केलेल्या आपदा मित्र व सखीचा आपत्कालीन व्यवस्थापन कामासाठी वापर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मॉन्सूनपूर्व तयारीसंदर्भातची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, मुख्य सचिव पुनित गोएल व महसूल सचिव संदीप जॅकीस उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Viral Video: 'गोवा महिलांसाठी सेफ नाही', बेंगळूरूच्या युवतीने व्यक्त केली चिंता; रेन्ट कॅबची एकाने फोडली काच

यावेळी झालेल्या चर्चेवेळी घटना प्रतिसाद पद्धतीची (आयआरएस) अधिसूचना काढण्यात आली. या बैठकीला विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांना त्यांच्या खात्याची भूमिका बजावण्यासाठी कामे सुरू करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

दोन्ही जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी तसेच तालुकावार उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्यानुसार काम करण्यास सुरवात केले आहे. आवश्‍यक मनुष्यबळही तयार ठेवण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती कोणी रोखू शकत नाही.

मात्र, त्यावर मात करून २४ तासांत ती पूर्वस्थितीत आणण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. पाणी व वीज समस्या पावसाळ्यात अनेक उद्‍भवतात त्यामुळे संबंधित खात्याच्या पथकांना तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

CM Pramod Sawant
Plastic Rice In Goa : बाणावलीत रेशनवर प्लास्टिक तांदूळ? आमदार व्हिएगस यांचा धक्कादायक दावा

15 दिवसांत गाळ उपसा

यावर्षी वन क्षेत्रात आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या आगी नैसर्गिक आपत्ती की मानवाने लावल्या आहेत, याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. शापोरा व साळ या नदीमुळे पूरसदृश्‍य परिस्थिती उद्‍भवू नये, यासाठी या नद्यांतील गाळ उपसा करण्याची गरज आहे.

समुद्रातून आत येणारे तसेच नदी गाळमुळे भरल्याने बाहेर जाणारे पाणी यामुळे तेथे पूर येण्याची शक्यता आहे. हा गाळ उपसण्याचे काम १५ दिवसांत करण्यास केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

30 तारखेपर्यंत कामे पूर्ण करा

स्मार्ट सिटीची कामे 30 पर्यंत पूर्ण करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सर्व खोदकामे या महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करून येथील रस्त्यांची डागडुजी होईल. या कामांचा दैनंदिन तत्वावर आढावा संबंधित अधिकारी घेत आहेत.

मळा येथील पूर स्थिती टाळण्यासाठी रुअ दे ओरेम येथील पाण्याचा पंप बदलण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com