Goa Mid-Day Meal: एका विद्यार्थ्यावर सरकार 20 रुपये खर्च करु शकत नाही, हे लज्जास्पद!

माध्यान्ह आहारावरून काँग्रेसची बोचरी टीका; आमदारांची खरेदी-विक्री मात्र करदात्यांच्या पैशांतूनच
Vijay Bhike
Vijay BhikeDainik Gomantak
Published on
Updated on

(Goa Mid-Day Meal) म्हापसा : भाजप सरकार हे फक्त करदात्यांच्या पैशांच्या गैरवापर करत स्वतःसाठी आमदारांची खरेदी-विक्री करीत आहे. दुसरीकडे, गोव्यात या सरकारकडे माध्यान्ह आहार चालविण्यासाठी पैसे नाहीत. एका विद्यार्थ्यावर हे सरकार २० रुपये खर्च करु शकत नाही, ही लज्जास्पद गोष्ट आहे, अशा शब्‍दांत काँग्रेसचे नेते विजय भिके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Vijay Bhike
Non Veg Food in Goa : गोव्यात शाकाहारापेक्षा मांसाहार स्वस्त!

येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मिताली गडेकर उपस्थित होत्या.

एकीकडे गोव्यातील भाजपचे सरकार केवळ 18 मिनिटांच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी तब्‍बल 6 कोटी रुपये खर्च करते. मात्र माधान्ह आहार योजनेसाठी सरकार पैसे खर्च करू पाहत नाहीत. यातून सरकारची मानसिकता कळते, त्यामुळेच बालहक्क आयोगाला याची दखल घ्यावी लागते, असा टोला भिके यांनी लगावला.

एकीकडे भाजप सरकार स्वयंपूर्णतेच्या बाता मारते, मात्र स्वयंसेवी गटांना त्यांच्या हक्काचे माध्यान्ह आहाराचे पैसे वेळेवर देत नाही. दुसरीकडे आपल्या नेत्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये चोख व्यवस्था करते, असेही ते म्‍हणाले. सरकारने शैक्षणिक, माध्यान्ह आहार, मूलभूत सुविधांवर लक्ष देण्याची गरज आहे, असे भिके म्हणाले.

Vijay Bhike
Mopa Airport : ‘मोपा’ला मिळणार मनोहर पर्रीकरांचे नाव

सरकारच्‍या कारभारावर नजर ठेवण्‍यासाठी येत्या नोव्हेंबरपासून संयुक्त मंचाअंतर्गत शॅडो सरकारची स्थापना करण्‍यात येणार आहे. याद्वारे गावागावांत जाऊन सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्‍यात येणार आहे.

- विजय भिके, काँग्रेस नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com