Non Veg Food in Goa : गोव्यात शाकाहारापेक्षा मांसाहार स्वस्त!

मत्स्यखवय्यांना पर्वणी; बांगडे, खेकडे, सुंगटे, इसवण घाऊक प्रमाणात उपलब्ध
Non Veg Food in Goa
Non Veg Food in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Non Veg Food in Goa : मत्स्यप्रेमी गोमंतकीयांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. बऱ्याच कालावधीनंतर सध्या मासळीचे पीक प्रचंड प्रमाणात आल्याने मासळी सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध झाली आहे. त्यात बांगड्याचे पीक खूप आल्याने त्याची विक्री 100 रुपयांना 25 बांगडे अशी होत आहे. विशेष म्हणजे सध्या मिळणारा बांगडा अतिशय रुचकर असल्याने ग्राहकांच्या बाजारात उड्या पडत आहेत.

बांगड्याबरोबरच कर्ली, समुद्री खेकडे, सुंगटे, इसवण, लेपो आदी मासळीही मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. मासळी खरेदीसाठी आज पणजी बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली होती. एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढलेले असताना मासळी स्वस्त झाल्याने मत्स्यखवय्यांसाठी ही पर्वणीच ठरली आहे.

राज्यातील बहुतांश नागरिक मत्स्याहारी आहेत. त्यामुळे जर जेवणाच्या ताटात आणखी एखादा मासा मिळाला तर आनंदात भरच. सध्या मासळी स्वस्त झाल्याने मत्स्यप्रेमी विविध प्रकारच्या मासळीवर ताव मारत आहेत. गोव्यात अनेक पर्यटक तसेच खवय्ये मासळीपासून बनविलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येतात. राज्यात सर्वत्रच मासळीचे दर समाधानकारक आहेत. मात्र, सणासुदीचे दिवस संपून देखील भाजीपाल्याचे दर काही उतरलेले नाहीत. त्यामुळे सध्या मांसाहारापेक्षा शाकाहार महाग झालेला आहे. पणजी मासळी बाजारात आज मोठ्या प्रमाणात मासळी उपलब्ध होती.

Non Veg Food in Goa
Mopa Airport : ‘मोपा’ला मिळणार मनोहर पर्रीकरांचे नाव

बांगड्यांचे पीक किनाऱ्याजवळच

मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बांगडा मिळत असल्याने दर कमी झाले आहेत. बांगड्यासाठी मासळी फॅक्टरीकडून 100 रुपये प्रति किलो दर अपेक्षित होता, परंतु सध्या बांगडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने मच्छिमारी ट्रॉलरमालकांना हा दर 30 रुपये मिळत आहे. मुंबई ते मंगळूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बांगडा मिळत आहे. यंदा बांगडा वगळता इतर मासे खोल समुद्रात गेल्याने बांगडे मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे ट्रॉलरमालकांचे म्हणणे आहे.

रापणीच्या मासळीला मोठी मागणी

राज्यात मासळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असली, तरी गोमंतकीय ग्राहक रापणीच्या मासळीच्या प्रतीक्षेत असतात. कारण रापणीच्या मासळीची चवच न्यारी असते. ही मासळी अगदी ताजी फडफडीत बाजारात उपलब्ध होत असल्याने त्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com