Manish Jadhav
पावसाळा सुरु होताच पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला ताम्हिणी घाट हिरव्यागार शालूमध्ये नटून जातो. येथील सौंदर्य मनाला भुरळ पाडणारे असते.
पावसाळ्याच्या दिवसांत या घाटातून प्रवास करताना समोरचे रस्तेही दिसणार नाहीत एवढे दाट धुके साचलेले असते. धुक्यातून गाडी चालवण्याचा थरार काही वेगळाच असतो.
घाटाच्या वळणावळणावर डोंगरावरुन कोसळणारे लहान-मोठे शेकडो पांढरेशुभ्र धबधबे पाहायला मिळतात. रस्त्याच्या कडेला थांबून या धबधब्यांचा आनंद घेता येतो.
ताम्हिणी घाटातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 'प्लस व्हॅली'. वरुन पाहिल्यास या दरीचा आकार अधिक (+) च्या चिन्हासारखा दिसतो, जो पावसाळ्यात अधिकच सुंदर भासतो.
घाटातून जातानाच तुम्हाला 'मुळशी धरण' (Mulshi Dam) आणि निसर्गरम्य 'कुंडलिका नदीचा' परिसर पाहायला मिळतो, जिथे रिव्हर राफ्टिंगसाठी पर्यटक गर्दी करतात.
पुणेकरांसाठी अवघ्या 2 तासांच्या आणि मुंबईकरांसाठी 3 ते 4 तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण एक दिवसाच्या पावसाळी सहलीसाठी (One Day Trip) सर्वोत्तम आहे.
पावसाळ्यात घाट रस्ते निसरडे होतात आणि अंधार लवकर पडतो. त्यामुळे गाडी जपून चालवा, खोल दरीत उतरणे टाळा आणि संध्याकाळ होण्यापूर्वी परतीचा प्रवास सुरु करा.