BCCI Womens T20 League: गोव्याच्या महिला क्रिकेट संघांकडून निराशा; महाराष्ट्र, मध्यप्रदेशकडून पराभव

Women's ODI Cricket Tournament: महिलांच्या २३ वर्षांखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याने चारपैकी दोन सामन्यांत पराभव पत्करला आहे, तर दोन सामने जिंकले आहेत.
Goa Womens Cricket
Womens CricketDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI Womens T20 League

पणजी: बीसीसीआय महिला क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या २३ वर्षांखालील संघाला टी-२० स्पर्धेत छत्तीसगडमधील रायपूर येथे महाराष्ट्राकडून ८९ धावांनी, तर १९ वर्षांखालील संघाला एकदिवसीय स्पर्धेत केरळमधील तिरुअनंतपुरम येथे मध्य प्रदेशकडून १८२ धावांनी पराभव पत्करावा लागला.

महिलांच्या २३ वर्षांखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याने चारपैकी दोन सामन्यांत पराभव पत्करला आहे, तर दोन सामने जिंकले आहेत. त्यांचा क गटातील अखेरचा सामना हरियानाविरुद्ध खेळला जाईल.

१९ वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याला तीन पराभव स्वीकारावे लागले असून फक्त एक विजय नोंदविला आहे. फ गटातील अखेरचा सामना आंध्र संघाविरुद्ध होईल.

Goa Womens Cricket
GCA: मतभेदाला तिलांजली, क्रिकेटला प्राधान्य! जीसीए आमसभेत ‘सतावणूक’ प्रकरण व्यवस्थापकीय समितीकडे

संक्षिप्त धावफलक ः

२३ वर्षांखालील टी-२० ः महाराष्ट्र ः २० षटकांत १ बाद १७५ (ईश्वरी सावकर नाबाद ९१, आयेशा शेख नाबाद ५१, उस्मा खान ४-०-१४-०, पूर्वा भाईडकर ४-०-४६-०, मेताली गवंडर ४-०-२९-०, भारती सावंत २-०-१०-०, सेजल सातार्डेकर ३-०-३९-०, कृपा पटेल १-०-८-०, तनया नाईक २-०-२४-१) वि. वि. गोवा ः १७.१ षटकांत सर्वबाद ८६ (कंविक्षा रेकडो ०, तनिशा गायकवाड १५, कृपा पटेल ०, पूर्वा भाईडकर १, उस्मा खान ३, तनया नाईक ०, हर्षदा कदम नाबाद २७, ऊर्वशी गोवेकर १, मेताली गवंडर १५, भारती सावंत ३, सेजल सातार्डेकर ७, ऐश्वर्या वाघ ३-१८).

Goa Womens Cricket
I League: धेंपो क्लबचा सलग दुसरा पराभव! दोन मिनिटे बाकी असताना काऊकोचा गोल; इंटर काशी अव्वलस्थानी

१९ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धा ः मध्य प्रदेश ः ५० षटकांत ३ बाद २७५ (श्रेया दीक्षित ९७, वैष्णवी व्यास नाबाद ६२, रिशिका जैन ३०, अँजल डिकॉस्ता १०-०-५४-०, निधी गोवेकर ९-०-४७-०, निखिला नाईक ९-०-४७-२, विधी भांडारे १०-०-४५-१, नॉल्मा डिसोझा ३-०-२१-०, आर्या आजगावकर ३-०-१७-०, अथश्री शिवारकर ६-०-४३-०) वि. वि. गोवा ः ४६.५ षटकांत सर्वबाद ९३ (पलक आरोंदेकर १, निखिला नाईक ०, हर्षिता यादव ५, अथश्री शिवारकर ११, शिल्पा शर्मा २, संचिता सैल ३५, आर्या आजगावकर ८, विधी भांडारे ०, निधी गोवेकर १, अँजल डिकॉस्ता ६, नॉल्मा डिसोझा नाबाद ०, तन्वी उपाध्याय ३-१८, अलिना खान ४-१८).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com