I League: धेंपो क्लबचा सलग दुसरा पराभव! दोन मिनिटे बाकी असताना काऊकोचा गोल; इंटर काशी अव्वलस्थानी

Inter Kashi Vs Dempo Club: फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत फिनलंडचा आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक काऊको याने ८८व्या मिनिटास बरोबरीची कोंडी फोडली.
Inter Kashi Vs Dempo Club
I League Football 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

I League Football 2025

पणजी: सामन्यातील दोन मिनिटे बाकी असताना जॉनी काऊको याचे हेडिंग भेदक ठरल्यामुळे इंटर काशी एफसीने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले, तर बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना गोलसाठी तिष्ठत ठेवलेल्या धेंपो स्पोर्टस क्लबला ०-१ फरकाने निसटता पराभव पत्करावा लागला.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत फिनलंडचा आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक काऊको याने ८८व्या मिनिटास बरोबरीची कोंडी फोडली.

त्यापूर्वी पाहुण्या संघाने सामन्यावर वर्चस्व राखूनही धेंपो क्लबने गोलपासून दूर ठेवण्यात सफलता मिळविली होती. सामन्याच्या आठव्याच मिनिटास धेंपो क्लबला धक्का बसला. संघातील प्रमुख खेळाडू अर्जेंटिनाचा ख्रिस्तियन दामियन रोआ याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले.

Inter Kashi Vs Dempo Club
I-League Football: चुरस चर्चिल ब्रदर्स आणि धेंपो स्पोर्ट्‌स क्लब यांच्यातील लढतीची; आय लीग स्पर्धेत होणार जोरदार घमासान!

त्याची जागा अमय मोरजकर याने घेतली. रोआ माघारी परतल्यामुळे धेंपो क्लबचे प्रशिक्षक समीर नाईक यांना नियोजनात बदल करावा लागला, तरीही माजी विजेत्यांनी इंटर काशी संघाला मोकळीक दिली नाही. पाहुण्या संघाचे मुख्य प्रशिक्षक अंतोनियो लोपेझ हबास यांना निलंबनामुळे सामना स्टँडमधून पाहावा लागला.

Inter Kashi Vs Dempo Club
I League 2024: घरच्या मैदानावर ‘धेंपो’समोर इंटर काशी संघाचे आव्हान; पंडित नेहरू स्टेडियमवर रंगणार सामना

धेंपो क्लबचा हा सलग दुसरा, तर एकंदरीत तिसरा पराभव ठरला. सात सामन्यांतून दहा गुणांसह त्यांची सहाव्या क्रमांकावर जावे लागले. धेंपो क्लबचा स्पर्धेतील पुढील सामना १४ जानेवारीस फातोर्डा येथे गोकुळम केरळा संघाविरुद्ध होईल. स्पर्धेतील चौथ्या विजयामुळे इंटर काशी एफसीचे सात सामन्यांतून १४ गुण झाले असून त्यांनी अग्रस्थानी उडी घेतली. त्यामुळे गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला १३ गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com