Mathematics Teaching Methods: गणिताची भीती दूर करा, विद्यार्थ्यांना आकड्यांच्या सौंदर्याची ओळख करून द्या

Mathematical Beauty For Students: शिक्षकांनी विद्यार्थ्यांतील गणिताची भीती दूर करून त्यांना गणितीय सौंदर्याकडे आकृष्ट करायला हवं.
Mathematical Beauty For Students
Mathematics Teaching MethodsDainik Gomantak
Published on
Updated on

मुकेश थळी

शिक्षकांनी विद्यार्थ्यांतील गणिताची भीती दूर करून त्यांना गणितीय सौंदर्याकडे आकृष्ट करायला हवं. शिकवणं ही एक कला. गणित ह्या विषयाला अगोदरच हावको (बागुलबुवा) करून सोडलाय. तो गंड हळूच काढून टाकायला हवा.

भारतांत अद्वितीय बुध्दिमत्ता असलेले गणितज्ञ होऊन गेले. ए. के. रामानुजम व इतर. शकुंतला देवी या अशाच एक. या ‘ह्यूमन कॉम्प्युटर’ म्हणून जगभर प्रसिद्ध झालेल्या भारतीय गणितज्ञ होत्या. त्या केवळ मानसिक गणनेत अद्वितिय नव्हत्या तर लेखिका, समाजचिंतक आणि समलैंगिकतेवर भारतातील पहिलं दिशादर्शक पुस्तक लिहिणाऱ्या लेखिकासुध्दा होत्या.

Mathematical Beauty For Students
Goa Film City Project: जागेअभावी फिल्म सिटीचे स्वप्न लांबणीवर; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

वयाच्या तिसऱ्या वर्षी कार्ड ट्रिक शिकताना शकुंतला देवींची आकडेमोडीची विलक्षण क्षमता दिसून आली. सहा वर्षांच्या असताना म्हैसूर विद्यापीठात गणिती कौशल्याचे प्रात्यक्षिक त्यांनी दिले. त्यांची संख्यांची गणन गती पाहून लोक अवाक व्हायचे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (१९८२) मध्ये त्यांच्या अद्वितिय विक्रमाची नोंद झाली.

त्यात त्यांनी दोन १३-अंकी संख्यांचे गुणाकार फक्त २८ सेकंदात केले. २३वे मूळ (रूट) काढण्याचा विक्रम त्यांनी केला. २०१ अंकी संख्येचे उत्तर ५० सेकंदात दिले. ते चूक की बरोबर हे समजून घ्यायला त्या काळी संगणक नसल्याने फार मोठे सायास पडले. शकुंतला देवींकडे ही अफाट क्षमता जात्याच होती.

गणित व कोडी या विषयावर शकुंतला देवींची काही पुस्तके आहेत. मुलांसाठी उत्तम. कठीण नाही. पण मेंदूला व्यायाम घडवणारी. गणिताची गोडी मुलांना लागू शकेल अशी. मुलांना गणिताची आवड व्हावी म्हणून मी अनेकांना कित्येक वर्षे झाली ही पुस्तके भेट देतो. शकुंतला देवी व इतर कठीण गणितीय कोडी सोडवल्यावर आपल्या मेंदूची क्षमता तसेच आत्मविश्वास वाढतो. कालांतराने सरावानिशी गणित हा खेळ आनंदी छंद होऊन जातो.

Mathematical Beauty For Students
Goa Drug Smuggling: कुरिअर-टपाल सेवांतून ड्रग्सची तस्करी; गोवा पोलिसांची कुरिअर कंपन्यांसोबत जनजागृती मोहीम

गणिताचा पाया घट्ट हवा. प्राथमिक गणिताचं ज्ञान हवं. अंकगणित महत्वाचं. त्यात सरासरी आणि टक्केवारी कशी काढावी हे कळायला हवं. मुलभूत भूमितीचं आकलन हवं. कारण आज नोकरीसाठी कुठलीही चाचणी असते त्या पेपरात काही प्रश्न गणिताचे असतात. कर्मचारी निवड आयोगाच्या विविध सरकारी पदांसाठी जी परीक्षा होते, त्यात अशा प्रकारचे प्रश्न असतात.

पाहायला सोपे वाटतात, चार पर्याय दिलेले असतात तरीही पूर्ण ज्ञान व सराव नसेल तर गडबडायची शक्यता असते. बॅंक कारकून परीक्षा, बॅंक प्रोबेशनरी अधिकारी परीक्षा, युपीएससीच्या आयएएस व तत्सम परीक्षा यात काही प्रश्न गणिताचे, तर्काधारीत विचारसरणीचे असतातच. तुम्ही गणित सोडाल परंतु गणित तुम्हाला कधीच सोडणार नाही असं एका गणितज्ञानं म्हटलं आहे. ते खरं तंतोतंत. मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेत गणिताचे कूटप्रश्न असतातच. आपण खूपच हुशार जरी नसलो आणि गणितावर प्रभुत्व जरी नसलं तरी एक किमान ज्ञान असायला हवं. तरून जाल.

Mathematical Beauty For Students
Goa Politics: 'भाजपला गोवा विकू देणार नाही'! मल्लिकार्जुन खर्गेंची गर्जना, एकीचं केलं आवाहन; काँग्रेसमध्‍ये नवचैतन्‍य

शिक्षकांनी विद्यार्थ्यांतील गणिताची भीती दूर करून त्यांना गणितीय सौंदर्याकडे आकृष्ट करायला हवं. शिकवणं ही एक कला. गणित ह्या विषयाला अगोदरच हावको (बागुलबुवा) करून सोडलाय. तो गंड हळूच काढून टाकायला हवा.

गणित सोपं करून शिकवायचं तंत्र आहे. कित्येक उदाहरणं देता येईल. हे एक - ६४ ही १ ते १०० मधील संख्या गंमतीशीर आहे. हा एकच आंकडा पूर्ण स्क्वेअर व पूर्ण क्यूब आहे. ८X८ = ६४ वर्ग आणि ४x४x४ = ६४ घन. बुद्धिबळ पटावर एकूण ६४ घरे असतात. आमच्या संस्कृतीत ६४ कला आहेत त्यांची नांवे दिली आहेत. असा हा ६४.

यूट्यूबवर गणिताचे अनेक पॉडकास्ट आहेत. गणिताची कोडी, गमतीजमती, जलद गणन पध्दती, आंकड्याचे जादूई खेळ वगैरे. मी सुध्दा या दृक-श्राव्य माद्यमातून गणिताचे रंजन करून घेतो. गणिताची आवड ताजी राहते. ए आय मुळे गणिताच्या झटपट क्रियांविषयी क्रांती झाली आहे. त्यात विस्तार होत आहे. सुलभता सुगमता येत आहे.

नवनवीन निष्कर्ष काढण्यास ए आय आधारभूत ठरत आहे. गणित संशोधनाविषयी अद्ययावत राहण्यास वा कुतूहल शमनासाठी, जिज्ञासा भागवण्यासाठी एआय जगतात काय चाललंय हे समजून घेणं आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाद्वारे मुलांना गणिताचं आकर्षण होईल अशा नवकल्पना आणि पध्दती अंमलात आणून गणिताची एक चळवळ चालवणे हिताचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com