

सासष्टी: गोव्यात फिल्म सिटीचा प्रकल्प उभारावा म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने काणकोण, सांगे आदी भागांमध्ये त्यासाठी जमिनीचा शोध चालवला होता. मात्र, सध्यातरी या प्रकल्पासाठी कुठेही योग्य सरकारी जागा उपलब्ध नसल्याने गोव्यात फिल्म सिटीचा प्रकल्प लांबणीवर आहे, असेच म्हणावे लागेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
रविवारी संध्याकाळी मडगावात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जर कोणी खासगी गुंतवणूकदार जागा विकत घेऊन तिथे फिल्म सिटी स्थापन करीत असेल, तर सरकार त्याचे स्वागतच करील. सरकार व मनोरंजन सोसायटीतर्फे फिल्म सिटीसाठी जागेचा शोध अजूनही सुरू आहे; मात्र, अजूनपर्यंत काहीही झालेले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा प्रशासकीय माथानी साल्ढाना इमारतीच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबद्दल आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी करून, त्यांचे कायद्यानुसार दुसरीकडे पुनर्वसन करण्यासाठी सूचना देतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तर पोलिसांवर कारवाई
पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश येतात; मात्र, हे कर्मचारी त्याच स्थानकावर दिसतात. याचे कारण काही पोलिस कर्मचाऱ्यांवर खटले व चौकशी सुरू असल्याने त्यांची बदली करूनही त्यांना दुसरीकडे जाता येत नाही, असे त्यांनी सांगितले. जर कोणी मुद्दामहून जात नसतील, तर त्याची चौकशी केली जाईल व योग्य कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.