Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

Single Women In Society: आपल्या समाजात स्त्रीचे आयुष्य अनेकदा तिच्या वैवाहिक स्थितीशी जोडले जाते.
Single Women In Society
Single WomenDainik Gomantak
Published on
Updated on

मनस्विनी प्रभुणे नायक

"तुझं लग्न कधी होणार?"

"एकटी राहतेस? भीती वाटत नाही?"

"मुलं नाहीत? मग म्हातारपणी कोण बघणार?"आजही हजारो एकल महिलांना अशा प्रश्नांना रोज सामोरं जावं लागतं. हे प्रश्न विचारणाऱ्यांना ते साधे वाटत असले, तरी ते अनेकदा त्या महिलेच्या वैयक्तिक आयुष्यावर, आत्मसन्मानावर आणि मानसिक आरोग्यावर घाव घालणारे असतात. समाज झपाट्याने बदलत असला तरी 'एकटी महिला' या संकल्पनेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही पूर्णपणे बदललेला नाही.

विवाह न झालेली, घटस्फोटित, विधवा, विभक्त किंवा अगदी स्वतःच्या इच्छेने एकटी राहणारी स्त्री, या सर्व महिलांना 'एकल महिला' या व्यापक संज्ञेत समाविष्ट करता येते. प्रत्येक महिलेची परिस्थिती वेगळी असते; मात्र त्यांच्या वाट्याला येणारी अनेक आव्हाने समान असतात. महिला एकटी राहू शकत नाही हा समाजाने आखून दिलेला अलिखित  नियम असल्याप्रमाणे सर्वजण एकल महिलेशी वर्तन करत असतात. 

Single Women In Society
हक्काच्या सुविधांसाठी रोज रस्त्यावरच उतरायचं का? प्रशासनाचा कणा उरलाय कुठे?

एकटेपणा म्हणजे अपूर्णत्व नाही

आपल्या समाजात स्त्रीचे आयुष्य अनेकदा तिच्या वैवाहिक स्थितीशी जोडले जाते. लग्न झाले की संसार, मुले आणि कुटुंब हेच तिच्या यशाचे मापदंड मानले जातात. त्यामुळे या चौकटीबाहेरचे आयुष्य जगणाऱ्या महिलांकडे अनेकदा संशयाने किंवा सहानुभूतीच्या नजरेने पाहिले जाते. पण एखादी महिला अविवाहित आहे, घटस्फोटित आहे किंवा विधवा आहे म्हणून तिचे आयुष्य अपूर्ण आहे, असे मानणे चुकीचे आहे.त्या नजरेने तिच्याकडे बघणे देखील चुकीचे. तिची ओळख तिच्या नात्यांनी नव्हे, तर तिच्या व्यक्तिमत्त्वाने, कर्तृत्वाने आणि स्वाभिमानाने ठरली पाहिजे. 

समाजाचे अदृश्य प्रश्न

एकल महिलांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे समाजाची मानसिकता. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ केली जाते. त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. अनेकदा त्यांच्या प्रत्येक कृतीचा चुकीचा अर्थ लावला जातो. भाड्याने घर घेताना, बँकेचे व्यवहार करताना, प्रवास करताना किंवा समाजात वावरताना त्यांना अतिरिक्त स्पष्टीकरण द्यावे लागते. 'एकटी महिला' या कारणामुळे त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. हीच मानसिकता बदलण्याची गरज आहे. 

Single Women In Society
Goa State Women Commission: राज्य महिला आयोगाचा कारभार 87 दिवसांपासून ठप्प! माजी अध्यक्षा रंजिता पै यांच्यानंतर नव्या नियुक्तीला सावंत सरकारला मुहूर्त मिळेना

सुरक्षिततेची सततची लढाई

एकल महिलांसाठी सुरक्षितता हा केवळ रात्रीच्या प्रवासाचा प्रश्न नाही. घर भाड्याने घेताना होणारे प्रश्न, कार्यालयातून उशिरा घरी येताना असलेली भीती, सोशल मीडियावरील छळ, आर्थिक फसवणूक, मालमत्तेवर डोळा ठेवणारे नातेवाईक, लैंगिक छळ या सर्व गोष्टींचा सामना अनेक महिलांना करावा लागतो. परंतु एकल महिलांना तो अधिक होतो. सुरक्षितता ही महिलांनी स्वतः मिळवायची गोष्ट नसून समाजाने आणि व्यवस्थेने हमी द्यायची जबाबदारी आहे.

आर्थिक स्वावलंबन - सर्वात मोठी ताकद

एकल महिलेचा सर्वात मोठा आधार म्हणजे आर्थिक स्वावलंबन. स्वतःचे उत्पन्न असल्यास ती स्वतःचे निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेऊ शकते. स्वतःचे घर, बचत, विमा, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन यामुळे भविष्य सुरक्षित होते. आज अनेक महिला छोट्या गृहउद्योगातून, ऑनलाइन व्यवसायातून, फ्रीलान्सिंग, शेती, स्वयंरोजगार किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ पैसा नव्हे; तो आत्मविश्वासाचाही आधार असतो.

Single Women In Society
International Mens Day: मुलाने विचारले 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा स्त्री दिनाप्रमाणे लोकप्रिय का नाही?’ तेंव्हा वडील म्हणाले.....

याची एकल महिलांना जाणीव असते. पण त्यांना त्यांच्या मानसिक आरोग्याचा विसर पडतो. एकटेपणा आणि एकाकीपणा यात फरक आहे. अनेक महिला एकट्या राहतात, पण समाधानी असतात. तर काहीजणी कुटुंबात राहूनही मानसिकदृष्ट्या एकाकी असतात. एकल महिलांमध्ये नैराश्य, चिंता, असुरक्षितता आणि भावनिक ताण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना कुटुंबाचा, मित्रांचा आणि समाजाचा भावनिक आधार मिळणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणाने बोलणे ही आजची गरज आहे. 

आज चित्र बदलत आहे. एकल महिला उद्योग उभारत आहेत. त्या परदेशात शिक्षण घेत आहेत.  प्रशासनात, न्यायव्यवस्थेत, संरक्षण क्षेत्रात, उद्योगात, पत्रकारितेत, विज्ञानात, क्रीडाक्षेत्रात आणि राजकारणात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्या स्वतःचे घर घेत आहेत. एकट्या प्रवास करत आहेत. स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत. ही नवी पिढी आहे.

Single Women In Society
Women Health: औषधांशिवाय मिळवा शांत झोप! खास महिलांसाठी 7 प्रभावी नैसर्गिक उपाय

आजच्या स्त्रीला आयुष्यात सफल होण्यासाठी विवाह हा एकमेव पर्याय वाटत नाही. तिच्या आयुष्याला अर्थ देणारे तिचे स्वप्न, तिचे कर्तृत्व, तिचे विचार आणि तिचा स्वाभिमान तिच्यासोबत आहे.  आज समाजाने ‘एकल महिला’ हा शब्द दयेचा विषय म्हणून नव्हे, तर स्वतःच्या बळावर उभ्या असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान म्हणून स्वीकारण्याची वेळ आली आहे. एकटी असणे म्हणजे कमकुवत असणे नाही; तर स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहण्याचे धैर्य असणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com