International Mens Day: मुलाने विचारले 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा स्त्री दिनाप्रमाणे लोकप्रिय का नाही?’ तेंव्हा वडील म्हणाले.....

International Mens Day 2025: पुरुष हा या जगातील सर्वात प्रस्थापित असलेला घटक नव्हे का? मग त्याचा आंतरराष्ट्रीय दिन कसा काय साजरा व्हावा?
International Mens Day 2025
International Mens Day 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

असा काही ‘आपला’ दिवस असतो म्हणून अनेक पुरुषांना कल्पनाही नसेल. कारण आंतरराष्ट्रीय दिन कुणाचा साजरा होतो तर ज्यांच्यावर अन्याय होतो, जे अंधारात आहेत, ज्याच्याबद्दल जगाला कळणे आणि ज्याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे त्यांचा. मात्र पुरुष दिन? पुरुष हा या जगातील सर्वात प्रस्थापित असलेला घटक नव्हे का? मग त्याचा आंतरराष्ट्रीय दिन कसा काय साजरा व्हावा? 

या दिनाबद्दल गुगल करता एक धक्कादाययक माहिती कळली की ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय महिला दिनाला संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाला त्यांनी मान्यता दिलेली नाही. संयुक्त राष्ट्र करत असलेल्या या भेदभावाचा खरे तर समस्त पुरुष मंडळींनी निषेध करायला हवा नाही का? गुगल अधिक धुंडाळता हे देखील कळते की अनेक देशांत, अनेक निमित्ताने आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.

त्रिनिदाद, माल्टा किंवा टोबॅगो यासारख्या टिचभर देशात वेगवेगळ्या दिवशी साजरा होणाऱ्या पुरुष दिनाला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून मिरवले जाते. हा पुरुषांचा सन्मान की केला जाणारा उपरोध हे समजायला मार्ग नाही. इतिहास हे देखील सांगतो की पुरुष दिन साजरा व्हावा म्हणून १९६० च्या दशकापासून प्रयत्न केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिन ज्या प्रकारे साजरा होतो त्याच प्रकारे २३ फेब्रुवारी हा दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा करण्यासाठी खाजगीरीत्या आंदोलने देखील झाली आहेत.

सोवियत युनियनमध्ये रेड आर्मी आणि नेव्ही डे म्हणून साजरा होणाऱ्या दिनाचे नामकरण २००२ मध्ये ‘डिफेंडर ऑफ द फादरलँड डे’ असे करण्यात आले. तथापि काही ऐतिहासिक घटनांवर लक्ष केंद्रित करून संघराज्यातील काही राज्यांनी १९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून स्वीकारला. याचाच अर्थ देशा-देशात कुठल्याच प्रकारे मतांची एकवाक्यता न होता, कशीबशी ही तारीख ठरवली गेली आहे. 

International Mens Day 2025
Surprising Men Facts: चमत्कारिक! पुरुषांबद्दलच्या 'या' गोष्टी कुणालाच नाही माहीत..

जरी आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिला दिन हे लिंग केंद्रित उपक्रम मानले गेले तरी वैचारिकरित्या ते एकमेकांपासून भिन्न आहेत हे पुरुषांनी सावधपणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.‌ आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा गेली अनेक वर्षे मजेदार मिम्स प्रचारात येण्याचा मार्ग बनला आहे.

International Mens Day 2025
International Men Day 2022: वडील, भाऊ, बॉयफ्रेंड यांना गिफ्ट द्यायचयं..तर मग जाणून घ्या हे बेस्ट ऑप्शन

एके ठिकाणी मुलगा आपल्या वडिलांना विचारतो आहे, 'बाबा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा आंतरराष्ट्रीय स्त्री दिनाप्रमाणे लोकप्रिय का नाही?’ तेव्हा वडील उत्तर देतात, 'कारण आम्हा पुरुषांच्या 'अचीव्हमेंट्स' आम्ही एका दिवसात साजर्‍या करू शकत नाही.' तेव्हा पुरुष दिन ज्या कुणाला अशा एखाद्या दिवशी साजरा करायचा असेल तो करो बिचारा पण गुप्तपणे साऱ्या पुरुषांना ठाऊकच असते, 'वर्षाचे सारे दिवस आपलेच आहेत.' 

वीरेंद्र आजगेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com