Sameer Amunekar
बालासन, सुप्त बद्धकोनासन, पवनमुक्तासन आणि विपरीत करणी ही आसने मेंदू शांत करतात, थकवा कमी करतात आणि शरीर झोपेसाठी तयार करतात.
मेंदूला विश्रांती मिळते, ताण कमी होतो आणि झोप लवकर लागण्यास मदत होते.
नर्व्हस सिस्टिम रिलॅक्स होते, पचन सुधारते, गॅस कमी होतो आणि शरीर हलकं वाटतं.
अनुलोम-विलोम तणाव कमी करतो, भ्रामरी मेंदूतील अस्वस्थता शांत करते, तर चंद्रभेदन शरीराला थंडावा देऊन झोपेसाठी आवश्यक शांतता निर्माण करते.
भाजी-चपाती, मूग-भात, खिचडी, सूप, ताक यांसारखे हलके पदार्थ घ्या. झोपण्यापूर्वी हळद किंवा जायफळ घातलेले कोमट दूध फायदेशीर ठरते.
तळलेले, मसालेदार पदार्थ, चहा-कॉफी, जास्त गोड पदार्थ आणि उशिरा जेवण टाळा.
दररोज एकाच वेळी झोपा, झोपण्याआधी मोबाईल-टीव्हीपासून अंतर ठेवा, संध्याकाळनंतर जड व्यायाम टाळा, डीप ब्रीदिंग/प्रार्थना करा आणि दिवसभर पुरेसे पाणी व सूर्यप्रकाश घ्या.