सॅम्युअलच्या आत्महत्येचे गूढ: सोशल मीडियावरील बदनामी, पोलिसांचा दबाव की दिसतो त्यापेक्षा वेगळाच गुंता?

Samuel Suicide Case Goa: ज्या पंचायत क्षेत्रात हा कचरा टाकला गेला, त्या पंचायतीला नोटीस गेली का?
Samuel Suicide Case Goa
Samuel Suicide Case GoaDainik Gomantak
Published on
Updated on

नीना नाईक

आजकाल सोशल मीडियावर कित्येक घटनांचे व्हिडिओ येतात. उद्‍घाटन, शिबिर, अपघात, मारामारी ते गाडी सुपरफास्ट असो, टुरिस्टचे वागणे, भांडण काहीही... मग ‘सिव्हिक सेन्स’ चा दाखवला तर काय बिघडले. ज्या पंचायत क्षेत्रात हा कचरा टाकला गेला, त्या पंचायतीला नोटीस गेली का?

सॅम्युअल अनंतात विलीन झाला. त्याची आत्महत्या अनेक प्रश्न मागे ठेवून गेली. कुठली तरी परिस्थिती त्याला थकवून गेली, की टाळलेल्या जबाबदारीचे ओझे त्याला शांत करून गेले? आत्महत्या हे टोकाचे पाऊल हे उचलताना त्याचा संघर्ष कुणाशी असावा हे कळत नाही.

Samuel Suicide Case Goa
Social Media: 'लाईक्स' आणि 'फिल्टर्स'च्या आभासी जगात आपण स्वतःलाच हरवून बसतोय का? वाचा 'स्व-प्रतिमे'चे मानसशास्त्र!

सॅम्युअलने कचरा टाकला मान्य. तो टाकताना त्याने विचार केला नाही. व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हाही तो झाली चूक म्हणून व्हिडिओ टाकला असता तर त्यावर पडदा पडला असता. असे मांडवीतही निर्माल्य टाकणारे आहेत. अशावेळी कुणी सांगितले कृपया पाण्यात निर्माल्य टाकू नका. तरी आपण ती कृती स्वीकारून क्षमस्व म्हणून दिलगिरी व्यक्त करतो.

प्रश्न व्हिडिओचा तो आजकाल सोशल मीडियावर कित्येक घटनास्थळीचे येतात. उद्‍घाटन, शिबिर, अपघात, मारामारी ते गाडी सुपरफास्ट असो, टुरिस्टचे वागणे, भांडण काहीही... मग ‘सिव्हिक सेन्स’ चा दाखवला तर काय बिघडले. लोक धावत्या गाडीतून बिअर टिप्स, चिप्सची पाकीट टाकतात. पान खाऊन पिचकारी टाकणारे सभ्य. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यांचे चित्रीकरण होते. त्यातून ‘सिव्हिक सेन्स’ विकसित व्हावा, हा उद्देश असेल तर कुठे बिघडले.

Samuel Suicide Case Goa
Social Media: सोशल मीडिया म्हणजे माकडांच्या हाती लागलेली कोलीत? ट्रोलरांच्या वानरी डीएनएला शुद्धीकरणाची गरज

ज्या पंचायत क्षेत्रात हा कचरा टाकला जातो, त्या पंचायतीला नोटीस गेली का? तिथे निवडून आलेले पंच, सरपंच, आमदार ह्यांचे लक्ष नाही म्हणून हा विषय मीडियाने मांडला तर कचरा टाकतानाच फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करणे कायद्याने बंधनकारक होते. तो कचरा कुणी केला असेल तर बाकीचे लोक आपल्यावर नजर ठेवून आहेत, असे समजून ते चुकीचे वागणार नाहीत. चुकीचे वा बरोबर हे निर्णय व्यवस्था घेईल.

सॅम्युअलच्या कुटुंबाच्या दुःखाला सामोरे जाण्यासाठी बळ मिळू दे. कुटुंबाने पोस्टमार्टम झाल्यानंतर काही आरोप पोलिसांवर केले. या घटनेनंतर सॅम्युअलच्या शरीरावर जखमा होत्या, असे वाचले. त्याच्या शरीरावरील जखमा दिसल्या, त्या भरून आल्या असत्या पण त्याच्या मनातील जखमा जास्त खोलवर होत्या. ज्यामुळे तो आत्महत्या करायला प्रवृत्त झाला. तो गेल्यावर हे बोलून उपयोग नाही, हे दुःख कुटुंबाला माहीत होते का, हा प्रश्न उपस्थित होतो.

Samuel Suicide Case Goa
Viral Video: ''पोरींनो दुनियेत कोणालाही डेट करा, पण...'', तरुणीच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर खळबळ; नेटीझन्सही चक्रावले

मला विश्वास बसत नाही, की गोव्यातील पोलिस साधे कचऱ्यासाठी कुणाला मारहाण करतील. गोव्यात पोलिसांकडे रोज शेकडो केसेस येतात लोक दारू पिऊन मारझोड होते, खून,अपघात,भुरटेपणा, व्यवहार ह्यापलिकडे अनेक. मुद्दा असा आहे, हा सॅम्युअल गोवेकर त्याचे कुणीतरी असेल की, जे व्यवस्थेवर ‘प्रेशर’ आणू शकते.

हे गोवा पोलिसांना ठाऊक असेल कुठेतरी ‘हॅलो पप्पा’ चा फोन येऊ शकतो. त्यामुळे वापरलेले शब्द आणि वागणूक हे पोलिस अधिकारी करणार नाहीत, असे वाटते. पुढील तपास चालू असताना ‘झाकली मूठ’ होऊ नये. दबाव समाजाचा असणार. फाटलेले संबंध त्यांचे एकत्रिकरण करण्यासाठी ‘सेफ्टिपिन’ म्हणून काही अधिकारी कार्यरत असतील. लोकांची ‘मेमरी’ कमी असते हा विषय हळूहळू विसरूनही जातील.

Samuel Suicide Case Goa
"गोव्यात येऊन समाधानी आहात का"? UAE मधून परतणाऱ्या गोमंतकीयाने Social Media वर विचारला प्रश्न; युजर्सनी केल्या भन्नाट कमेंट्स

‘सेफ्टिपिन’ किती तग धरून ठेवणार हे पाहावे लागेल. संयम, वेळ मारून नेणे ह्यात माणसं जपणे आणि इतरांना वापरणे होणार.

पोलिस खात्याने काही योजना आखल्या होत्या. सीटबेल्ट, सिग्नल तोडणे, नो पार्किंग मध्ये गाडी लावणे हे ही व्हिडिओ प्रसृत होत असतात. अपघातांचे व्हिडिओ, मग पोलिसांत तक्रार हे व्यवस्थेचे भाग आहेत. नियम पाळावेत हा त्यामागे उद्देश असतो.

ह्या प्रकरणात दिसते त्यापेक्षा अधिक किंवा वेगळ्या प्रकारची माहिती लपवली तर जात नाही ना? कुठेतरी गोम आहे. विषय नाजूक आहे. अशा परिस्थितीत पालकांनी विचार करावा. आपल्या पाल्याला आपण जास्त ओळखता. रोजच्या आयुष्यात महिला पुरुष कितीतरी तणावाखाली वावरतात. त्यातून ते उपाय शोधतात. आत्महत्या हा त्यावर तोडगा नाहीच. जीवन सत्कारणी लावा, नियम पाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com