Viral Video: ''पोरींनो दुनियेत कोणालाही डेट करा, पण...'', तरुणीच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर खळबळ; नेटीझन्सही चक्रावले

Funny Relationship Advice Social Media Trend: सध्या असाच एक आगळावेगळा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यातील तरुणीच्या वक्तव्याने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले.
Funny Relationship Advice Social Media Trend
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Girl Viral Video Never Date Eldest Son: आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि त्यात इंटरनेट डेटा उपलब्ध असल्यामुळे लोकांना मनात येईल ते व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया हे एक सोपे व्यासपीठ बनले आहे. एखादी भावना मांडायची असेल किंवा काही सांगायचे असेल, तर लोक लगेच व्हिडिओ बनवून तो पोस्ट करतात.

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ पोस्ट केले जातात, परंतु त्यातील काहीच व्हिडिओ व्हायरल होतात जे लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात. सध्या असाच एक आगळावेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यातील तरुणीच्या वक्तव्याने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडिओमध्ये एका तरुणीने 'घरच्या मोठ्या मुलाला डेट न करण्याचा' अजब सल्ला दिला.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ती तरुणी अत्यंत उद्विग्न होऊन सांगते की, जगात तुम्ही काहीही करा, कोणालाही डेट करा, पण घराच्या एकुलत्या एक मोठ्या मुलाला कधीही डेट करु नका. आपल्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली की, या लोकांच्या डोक्यावर एवढी जबाबदारी असते की, कदाचित देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यावरही तेवढी नसेल. तिचा बॉयफ्रेंड हा त्याच्या घरचा मोठा मुलगा असल्यामुळे ती त्याच्यासोबत पुरेसा वेळ घालवू शकत नाही, अशी तिची तक्रार आहे. मोठ्या मुलांकडे स्वतःच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या इतक्या असतात की त्यांच्यासोबत वेळ घालवणे अशक्य होऊन बसते, कारण त्यांच्याकडे स्वतःसाठीच वेळ नसतो, असे ती या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.

Funny Relationship Advice Social Media Trend
Viral Video: "तो प्रवासी माझाच!" भररस्त्यात सुरू झाली रिक्षावाल्यांची 'WWE'; प्रवाशाने ठोकली धूम, व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

हा व्हिडिओ 'एक्स' वर @UniqueUpadhyayy नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ पोस्ट होताच काही वेळातच तो हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटीझन्सनी वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने तरुणीच्या मताशी सहमती दर्शवत "तिने जे सांगितले ते एकदम खरे आणि योग्य आहे" असे लिहिले. तर दुसऱ्या एका युझरने याच्या अगदी उलट मत मांडत, "असे काहीही नसते, सर्व कामे आणि जबाबदाऱ्या बिचारे लहान मुलेच पार पाडतात" असे म्हणत मोठ्या भावांची बाजू घेतली. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या मुलांच्या जबाबदाऱ्यांवरुन एक नवीच आणि गमतीशीर चर्चा रंगली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com