Social Media: सोशल मीडिया म्हणजे माकडांच्या हाती लागलेली कोलीत? ट्रोलरांच्या वानरी डीएनएला शुद्धीकरणाची गरज

Cyber Forensics India: आजच्या वर्तमानकाळाचे खूळ म्हणजे सोशल मीडिया जी ‘फ्रिक्शन व फॅन्टसी’ने ओतप्रोत भरलेली आहे व यातून निर्माण होणाऱ्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी ‘सायबर फॉरेन्सिक’ हा विषय आता उदयाला येत आहे.
Social Media
Social MediaDainiak Gomantak
Published on
Updated on

डॉ. मधू स. घोडकिरेकर

आजच्या वर्तमानकाळाचे खूळ म्हणजे सोशल मीडिया जी ‘फ्रिक्शन व फॅन्टसी’ने ओतप्रोत भरलेली आहे व यातून निर्माण होणाऱ्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी ‘सायबर फॉरेन्सिक’ हा विषय आता उदयाला येत आहे. या विषयाचे महत्त्व भारतात वाढत आहे कारण सोशल मीडियावर ट्रोल करण्याच्या प्रकारात, फिलीपाईन देशानंतर भारताचा दुसरा नंबर लागतो. लोकामध्ये फॉरेन्सिक या विषयाशी कुतूहल आहे .

तेवढीच ‘फ्रिक्शन व फॅन्टसी’ डीएनएबाबत आहे. जगप्रसिद्ध संशोधक अलबर्ट आईन्स्टाइन यांचे निधन १९५५साली झाले तेव्हा डीएनए फिंगरप्रिंटिंगचे संशोधन अस्तित्वात नव्हते, तरी पुढे कधीतरी नवीन संशोधन येईल व त्यांच्या मेंदूवर संशोधन करता येईल म्हणून डॉक्टरांनी त्याचा मेंदू मरणोत्तर राखून ठेवला आहे. हल्ली लोक उठसुठ डीएनएच्या परीकथा सांगतात पण या लोकांना माहीत नाही की अलबर्टचा मेंदू फोर्मलीनमध्ये राखून ठेवल्याने त्यावर डीएनए चाचणी करणे शक्यच नाही. थोडक्यात डीएनए चाचणीला मर्यादा आहे.

Social Media
प्रादेशिक ‘गड’ खालसा ! -संपादकीय

आता सोशल मीडियावर ट्रोल प्रकारांना थेट डीएनएरचनेशी जोडीत, ही एकूण वृत्ती ‘माकड स्वभाव’ भावाशी निगडीत असल्याचे मानले जाते व त्यानुसार वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. काही देशात ‘माकड’ हा वर्णद्वेषी शब्द मनात असल्याने, त्याच्या बदल्यात भुंकणारे कुत्रे, विष्ठा करणारी कबुतरे, अंगावर येणारे बैल असे स्वभावदर्शक प्रकार सांगितले जातात. मराठीत आपण ’वानर’ आणि ’माकड’ हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो, परंतु विज्ञानाच्या दृष्टीने त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक आहेत. इंग्रजीत ज्या, शेपटी नसलेल्या मोठ्या आकाराच्या, माकडांना ‘एप्स’ म्हणतात त्यांना आम्ही वानर म्हणू शकतो.

Social Media
जामीन मिळालाय, निर्दोषत्व नाही ! - संपादकीय

रामायणात प्रभू रामचंद्राच्या वानरसेनेने लंका सेतू ‘उभारला’ असे आपण म्हणतो, पण कधी त्यांचा ‘माकडसेना’ असा उल्लेख करत नाही. आपण ‘मर्कट चेष्टा’, ‘माकड उड्या’ म्हणतो तेथे ’वानर’ शब्द वापरत नाही. माकड ते मानव या उत्क्रांती प्रवासातील ‘वानर’ हा एक मधला टप्पा आहे. वानर व मानव यातील साम्य म्हणजे दोघांतही शेपूट जाऊन, त्याची आठवण स्वरूपात माकड ‘हाड’ अजून अस्तित्वात आहे. गोरिला, चिंपांझी, ओरंगुटां किंवा गिब्बन या वानराची शरीररचना मानवाच्या तुलनेत मोठी असली तरी सूक्ष्म स्वरूपातील ‘डीएनए’मध्ये ९७ ते ९९ टक्के तंतोतंत साम्य आहे.

Social Media
Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

वानर व माकड यांच्यातील डीएनए फरक आठ ते नऊ टक्के असा आहे. बेरीज वजाबाकीच्या हिशोबात, मानवाच्या डीएनएचा ९० टक्के भाग माकडस्वरूप, ९ टक्के वानर स्वरूप व राहिलेला एक टक्का भाग हा मानव विशेष. जगभराच्या मानवाच्या डीएनए आपसात तुलना केली तर सर्वांमध्ये ९९.९९ टक्के साम्य आहे. म्हणूनच असावे जगभरचा मानव शरीरात फरक असला तरी ठायी स्वभावात एकसारखा आहे. वैचारिक संघर्षाच्या वेळी जर ९९ टक्के वानरी डीएनएचा प्रभाव एक टक्का मानवी डीएनए भारी ठरला तर मानवात पशू संचारतो असे न्यायवैद्यक मानसशास्त्र मानते.

आज सोशल मीडिया हे जगव्यापी आभासी जंगल आहे. जसे आम्ही प्रणयक्रीडेत पशूसम विवस्त्र होत तसे या आभासी जंगलात पोहोचलो की आम्ही माकड बनतो. मागील आठवड्यातील लेखातही परशुराम वादाचे पाऊल पडती पुढे, यावर लिहिले होतो. या ताज्या परशुराम पुराणात डॉ. मनोज सोलंकी या हिंदू जनजागृती समितीच्या राज्य प्रवक्त्याने आपला म्हणून एक छोटासा अध्याय जोडला. ‘गोमन्तक टीव्ही’वरील चर्चेत आपल्या युगांक नाईकने त्याला एका फुग्यात हवा २७ सेकंदाची हवा भरण्यास प्रवृत्त केले तर तेथे अमेरिकेत बसून कौस्तुभ नाईकने त्या फुग्याला टाचणी टोचली. परिणामी डॉ. मनोज सोलंकीना स्पष्टीकरण द्यावे लागले.

त्यात ते म्हणतात की ‘बुद्धी नाही, पैसा नाही म्हणून शूद्रांनी शरीराने साधना करावी’ असे विवेचन भगवद्गीतेत केले आहे. एकंदरीत रामायण दाखल्यानुसार वानराची बुद्धी मानवबुद्धीला जवळची आहे, ज्याला आधुनिक युगातील डीएनए चाचणीमुळे दुजोरा मिळतो. आता फॉरेन्सिक सायबरवाले म्हणतात ट्रोलिगवाल्यांचा आभासी जंगलात एक माकड समूह असतो, ज्यांची प्रत्यक्ष जात किंवा धर्म कुठलाही असू शकतो. कर्मानुसार वर्ण ठरतो तर यांचे कर्म शूद्र म्हणण्याच्याही लायकीचा नसते.

Social Media
ॲपलचं 'कूक' पर्व संपलं! आता 'हार्डवेअर मॅन' जॉन टर्नस यांच्या हाती यशाची चावी- संपादकीय

डॉ. मनोज सोलंकी भाषेत बुद्धी नाही, पैसा नाही अशा शूद्रांना साधनेसाठी शरीर तरी लागते, पण या ट्रोल माकडांना आपल्या कर्मासाठी बुद्धी, पैसा व शरीर यांपैकी कशाचीच गरज लागत नाही. भारतात अशी माकडे धर्म, राजकारण व क्रिकेट असे विषय आपल्या शेपटीला बाधून इकडे तिकडे आग लावत उड्या मारत फिरतात. आपल्याकडील अशा माकडासाठी भाषावाद, परशुराम, फ्रान्सिस झेविअर हे विषय खूप झाले. अक्षय तृतीयेच्या चांगल्या मुहूर्तावर परशुराम अवतरणाचा महोत्सव आठवडा चालणार होता, पण कुठे काय चुकले कोण जाणे, परशुराम व फ्रान्सिस झेविअर यांच्या नावाने शंख दोन्ही बाजूच्या वानरबहाद्दरांनी वाजविले.

या गोंधळात, काही परिश्रम न घेता बहुजनांच्या बुद्धिजीवी वर्गाने दिलेला, ’आम्ही मिथकाला इतिहास म्हणून स्वीकारलेले नाही’, असा संदेश आमच्याकडे पोहोचल्याची अप्रत्यक्ष पोचपावती डॉ. सोलंकीनी आपल्या स्पष्टीकरण निवेदनात दिली आहे. ‘बुद्धी नाही, पैसा नाही म्हणून शरीराने साधना करावी’ असे डॉ. मनोज सोलंकी सुचवितात त्यात वास्तव आहे. ही शरीराने साधना करायची म्हणजे कष्टाने मळा उगवाचा. पुढे हा मळा सुपीक झाला की बुद्धी व पैसा असलेला समाज, त्यात मिथकाचा बाण रोवून मोकळे होते. पुढे इंग्रज पोर्तुगीज असे धर्मांध राजे येतील, पण तेथेही बुद्धी व पैसा असलेला कथित समाज, मळा उगविलेल्या समाजाला दूर सारून मोकळे होतात.

Social Media
भळभळती आठवण- संपादकीय

असे असूनही ‘बुद्धी नाही, पैसा नाही’ हा समाज आजही बहुसंख्येने आहे, तर त्यांना दूर सारणाऱ्या समाजात एक तरी खुळा पांगळा असतोच. ‘बुद्धी नाही, पैसा नाही’ या समाजाचा कैवारी हा निसर्ग स्वत: आहे. ताजे उदाहरणच पहा ना, मिथकाचा इतिहास झाला याचा विजयोत्सव साजरा करण्यात गोव्यात आलेल्याचे ज्या पद्धतीने बारा दिवस हाल झाले, ते अकल्पित आहे. राखणदार चोहोबाजूंनी कोंडी करतो तेव्हा आत अडकलेला हतबल होऊन आदळ आपट करावी लागते, असे आम्ही ऐकले होते, यावेळी ते प्रत्यक्ष अनुभवले.

राखणदाराने रण उठविले तर ते बारा दिवस जळते, अशी धारणा आहे, परशुराम अवतरण सोहळ्याच्या निमित्ताने उठलेले रण तब्बल बारा दिवस जळले. हतबल होऊन आदळआपट करणाऱ्या एकाला गरज व संबंध नसताना गावड्याच्या शुद्धीकरणाचा विषय सोशल मीडियावर आणावासा वाटला. एकदा डोक्यात ट्रोल माकड शिरला की स्वत:ची संयम संवेदनशीलता वगैरे बाकी राहत नाही, त्यातलाच हा प्रकार होता. र टाकून बघा.

Social Media
नारीशक्ती वंदनापुरती!- संपादकीय

अशा व ट्रोलची नशा जडलेल्या सर्वांनाच मी भूतकाळाच्या शुद्धीकरणाच्या आठवणी काढण्यापेक्षा स्वत:मध्ये अजून शिल्लक असलेल्या वानरी डीएनएच्या शुद्धीकरण आधी करून घ्या, असे सुचवू इच्छितो. हा वानरी डीएनए , मानवी डीएनएवर वरचढ ठरला की आपल्या नजरेत आपला कोण व परका कोण, यातील फरक कळत नाही. आपल्यासमोरील सगळेच लोक आपले दुश्मन वाटतात. माझे खोटे वाटत असेल तर, आपल्याच सोशल मीडिया पोष्टवर एक नज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com