काँग्रेसचं गोव्यात 'मायेचो हात'! पेट्रोल/डिझेल देणार 80 रुपये दराने

साखळीतील जाहीर सभेत राहुल गांधींकडून काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
Rahul Gandhi Declares Congress manifesto for Goa Elections
Rahul Gandhi Declares Congress manifesto for Goa ElectionsDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी : गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात घेतलेल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीरनाम्याचं अनावरण केलं. गोमंतकीय जनतेसाठी काँग्रेसने न्याय योजनेच्या माध्यमातून महिन्याला 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. (Rahul Gandhi Declares Congress manifesto for Goa Elections News Updates)

न्याय योजनेच्या माध्यमातून गोव्यातील गरीब कुटुंबाला महिन्याला 6 हजार रुपये देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. म्हणजेच या योजनेमुळे गरीब कुटुंबाला वर्षाकाठी 72 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करणार असल्याचं काँग्रेसकडून (Congress) आपल्या जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलही 80 रुपये दराने दिलं जाणार आहे. काँग्रेसकडून या योजनेला मायेचो हात असं नाव देण्यात आलं आहे.

यासोबतच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षणाची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. येत्या सहा महिन्यात विविध सरकारी विभागातील रिक्त जागा भरणार असल्याचंही राहुल गांधी यांनी जाहीर केलं आहे. यासोबतच 5 वर्षांहून अधिक काळ सरकारी नोकरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेतलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Rahul Gandhi Declares Congress manifesto for Goa Elections
गाणं गात, सेल्फि घेत राहूल गांधी गोव्याच्या मैदानात

दरम्यान साखळीतील आपल्या भाषणात राहुल गांधींनी भाजप (BJP) सरकारवर सडकून टीका केली आहे. नोटाबंदीमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. नोटबंदीच्या रांगेत फक्त गरीब उभे होते. तुमच्या खिशातील पैसा घेऊन काही पाचदहा अब्जाधीशांना दिला. जीएसटीचा फायदा कुणाला अमिर हिंदूस्तानला, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. कृषी क्षेत्राच्या बाबतीतही हाच प्रकार होताना दिसतोय. आता गोव्यातील कोळशाच्या फायदा कुणाला होतोय. त्याच लोकांना होतोय, असा आरोपही राहुल गांधींनी केला.

आम्हाला छोटे दुकानदार, गरीब लोकांच्या विकासासाठी सरकार आणायचंय. छत्तीसगडनंतर आता गोव्यात नवीन योजना आणणार. न्याय योजनेच्या माध्यमातून मायेचो हात गोमंतकीय जनतेसाठी आणणार असल्याचं राहुल गांधींनी जाहीर केलं. प्रत्येक महिन्यात 6000 रुपये म्हणजेच वर्षाला 72 हजार रुपये गोव्यातील गरिबांच्या बँक अकाउंटमध्ये जाणार. काहीही झालं तरी ही योजना थांबणार नाही. गोवा या प्रदेशात कुणीही उपाशी राहिलेलं आम्हाला नकोय. भीती संपली पाहिजे की आमची मुलं शाळेत जाऊ शकणार नाहीत, असंही राहुल गांधी पुढे म्हणाले आहेत.

Rahul Gandhi Declares Congress manifesto for Goa Elections
पणजीसह अनेक मतदारसंघांत अपक्षांचा ‘बोलबाला’

भाजपने गोमंतकीय तरुणांच्या रोजगारासाठी काय केलं. पर्यटनासाठी काय केलं. भाजप सरकार फेल आहे. यावेळी काँग्रेसने निर्णय घेतला, धोका देणाऱ्यांना आम्ही तिकीट दिलं नाही. आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आणि आता पुन्हा काँग्रेसचं सरकार येणार. भाजप आणि काँग्रेसमध्येच लढत आहे त्यामुळे तुमचं मत वाया घालवू नका. तुमचंच नुकसान होणार. पूर्ण बहुमताने काँग्रेसला निवडून द्या. आम्हाला बहुमत हवंय. काँग्रेसला मत द्या मिळून लढूया आणि नवीन गोवा आणि नवीन सरकार स्थापन करुया जे तुमचं असेल तुमचं ऐकेल, असं आवाहनही राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केलं आहे.

गोव्यात येऊन मला कायम आनंद होतो. मात्र मी 1-2 दिवसांसाठी येतो याचं वाईट वाटतं. पुढच्या वेळी 7-8 दिवसांसाठी येणार आणि तुमच्या सुंदर प्रदेशात चांगला वेळ घालवेन. मी तुमचा दिल्लीतील प्रतिनिधी आहे. माझे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले आहेत. कायम तुमच्या मदतीसाठी मी तत्पर असेन, अशा शब्दात राहुल गांधींनी गोमंतकीय जनतेला भावनिक साद घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com