गाणं गात, सेल्फि घेत राहूल गांधी गोव्याच्या मैदानात

गोव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधींचा निवडणूक मंत्र
Rahul Gandhi Campaign in Goa
Rahul Gandhi Campaign in GoaTwitter/@satejp
Published on
Updated on

Rahul Gandhi Campaign in Goa: गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. याच क्रमाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज दुपारी गोव्यात पोहोचले , दाबोळी (Dabolim Airport) आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन होताच गोव्यातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले . विमानतळावर उतरल्यानंतर ते थेट घरोघरी प्रचारासाठी गेले. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते पी चिदंबरमही (P. Chidambaram) होते. राहुल गांधी आज पणजीत (Panaji) घरोघरी जावून प्रचार करत आहेत. ते आजचा पुर्ण दिवस गोव्याच्या निवडणूक (Goa Election 2022) प्रचारात आणि कार्यक्रमात घालवणार आहेत. घरोघरी प्रचारादरम्यान राहुल गांधींनीही गोवेकरांचे गाणेही ऐकले. (Rahul Gandhi Goa Visit)

राहुल गांधींनी घरोधरी जावून सर्वांची भेट घेतली. राहुल गांधी 2 फेब्रुवारीला गोव्यात येणार होते, मात्र त्या दिवशी त्यांचा दौरा रद्द झाला. येथे येऊ शकले नाहीत. आजच्या दौऱ्यात गांधी उद्योग प्रतिनिधी, अंगणवाडी सेविकांसह घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. असे गोवा समितीचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

Rahul Gandhi Campaign in Goa
योगी आदित्यनाथांचे कार्य प्रमोद सावंतांना गोव्याच्या विकासासाठी प्रेरणा देते

काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधींचा निवडणूक मंत्र

राहुल गांधी गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना निवडणूक मंत्रही देतील. दुपारी 2.15 वाजता ते पर्यटन उद्योगाच्या प्रतिनिधींना भेटतील आणि दोना पॉला येथे ते सीआयआयच्या प्रतिनिधींनाही भेटतील. सायंकाळी राहुल गांधी साखळी येथील साखळी म्युनिसिपल मैदानावर 'निर्धार' या व्हरच्युअल रॅलीत सहभागी होतील. दरम्यान प्रचारासाठी गोव्यात दाखल झालेल्या राहुल गांधींनी लोकांमध्ये बसून फोटो आणि सेल्फिही काढली आहे. त्याचा एक व्हिडिओही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्याला "आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्यामध्ये आहेत" असे कॅप्शन दिले.

गोव्यात 14 फेब्रुवारीला विधानसभेच्या 40 जागांसाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) सोबत येथे निवडणूक लढवत आहे. काँग्रेस 37 जागांवर तर जीएफपी ३ जागांवर निवडणूक लढवत आहे. निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींच्या टीएमसीने गोव्यातील अनेक काँग्रेस नेत्यांना फोडले आहे. त्यामुळे काँग्रेसला गोव्यात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. या वेळी काँग्रेसने गोव्यातील आपल्या सर्व उमेदवारांना विधानसभा निवडणुकीनंतर जनता आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्यास सांगितले. गेल्या निवडणुकीच्या निकालानंतरच्या घडामोडी पाहता काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com