Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Kanpur Pregnant Woman Suspicious Death: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर येथे एका सात महिन्यांच्या गर्भवती तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
Kanpur Pregnant Woman Suspicious Death
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Kanpur Pregnant Woman Suspicious Death: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर येथे एका सात महिन्यांच्या गर्भवती तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. हे दोन्ही आरोपी तरुणीचे कथित प्रियकर असल्याचा दावा पोलिसांनी केला. काही दिवसांपूर्वी या 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह गावाबाहेरील एका आंब्याच्या बागेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून आवश्यक पुरावे गोळा केले.

मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पतारा येथील रहिवासी अरविंद उर्फ गोला पांडे आणि फतेहपूर जिल्ह्यातील नरैनी येथील रहिवासी प्रांजुल पाल यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी (Police) या दोघांनाही अटक करुन न्यायालयात हजर केले, तेथून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.

Kanpur Pregnant Woman Suspicious Death
Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात वादळ आणि पावसाचे 100 बळी, जनजीवन विस्कळीत; बाधितांना आर्थिक मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तरुणी सात महिन्यांची गर्भवती असल्याची पुष्टी झाली. अत्याचाराच्या संशयावरुन डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीसाठी स्लाईड तयार करुन नमुने सुरक्षित ठेवले आहेत. याशिवाय गर्भातील बालकाचा डीएनए नमुनाही जतन करण्यात आला. मात्र, या अहवालात तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलीस आता वैद्यकीय आणि फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत.

Kanpur Pregnant Woman Suspicious Death
Cyber Crime: APK File डाउनलोड करणं पडलं महागात! आके येथील महिलेच्या बँक खात्यातून 6.5 लाख उकळले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

घाटमपूरचे एसीपी कृष्णकांत यांनी सांगितले की, पोलीस चौकशीत आरोपी प्रांजुल पाल याने आपण सुमारे चार वर्षांपासून या तरुणीच्या संपर्कात असल्याचे सांगितले. तरुणी उपचाराच्या नावाखाली आपल्याकडून वारंवार पैसे घेत असल्याचा दावाही त्याने केला.

Kanpur Pregnant Woman Suspicious Death
Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

दुसरीकडे, दुसरा आरोपी अरविंद याने पोलिसांना सांगितले की, तो तरुणीच्या वडिलांना आपली शेतजमीन कसायला द्यायचा आणि त्यातूनच तिची ओळख झाली. त्याने तरुणीला आर्थिक मदत केल्याचे आणि स्कूटी घेऊन दिल्याचेही चौकशीत कबूल केले. तरुणीने गरोदर असल्याची माहिती दिल्यानंतर, अरविंद तिला उपचारासाठी कानपूरच्या एका रुग्णालयात घेऊन गेला होता. तिथे त्याने स्वतःला तिचे वडील सांगून उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टरांनी तिची अवस्था पाहून उपचारास नकार दिला. त्यानंतर तो तिला रुग्णवाहिकेतून गावाच्या वेशीपर्यंत घेऊन आला आणि तिला घरी जाण्यास सांगून स्वतः परत गेला.

Kanpur Pregnant Woman Suspicious Death
Maharashtra Crime News: 'आमच्या मृत्यूला कोणालाही दोषी धरु नका'! आर्थिक विवंचनेतून पती, पत्नी आणि 19 वर्षांच्या मुलीनं संपवलं जीवन; महाराष्ट्र हादरला

दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडल्याचे समजताच तो घाबरुन पळून गेला. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील कमालगंज येथेही एका पतीने पत्नीच्या गळ्याभोवती ओढणी बांधून तिला थेट गंगा नदीत फेकल्याची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com