Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

Indian National Murdered In Jerusalem Israel: इस्त्रायलमधील जेरुसलेम शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली.
Indian National Murdered In Jerusalem Israel
Indian citizen killed in Israel latest newsDainik Gomantak
Published on
Updated on

Indian National Murdered In Jerusalem Israel: इस्त्रायलमधील जेरुसलेम शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली. तिथे राहणाऱ्या एका 40 वर्षीय भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून, इस्त्रायली पोलिसांनी या हत्याप्रकरणात एका 31 वर्षीय स्थानिक नागरिकाला तात्काळ अटक केली. जेरुसलेममधील कटामोन परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कटामोन भागातील एका बंद खोलीत भारतीय नागरिक रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून मोरिया पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक तपास पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खोलीतील दृश्य अत्यंत भीषण होते; संपूर्ण फरशीवर रक्ताचे डाग होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुरावे गोळा केले. प्राथमिक तपासावरुन हा प्रकार पूर्णपणे गुन्हेगारी स्वरुपाचा आणि पूर्वनियोजित हत्येचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Indian National Murdered In Jerusalem Israel
Iran Israel War: युद्धामुळे बदललेली वैश्विक समीकरणे

घटना घडल्यानंतर जेरुसलेमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी जलद गतीने सूत्रे हलवत एलाट येथील रहिवासी असलेल्या 31 वर्षीय इस्रायली संशयिताची ओळख पटवली आणि त्याला बेड्या ठोकल्या. सध्या या संशयिताची चौकशी सुरु आहे. मात्र, सुरक्षेच्या आणि तपासाच्या कारणास्तव मृत भारतीय नागरिक आणि आरोपी इस्रायली व्यक्तीची नावे अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत.

Indian National Murdered In Jerusalem Israel
Israel Gaza Surgical Strike: हमासचा नवा लष्कर प्रमुख ठार! इस्रायलची मोठी कारवाई; 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा 'मास्टरमाइंड' अखेर ढेर VIDEO

या घटनेची गंभीर दखल घेत जेरुसलेम जिल्हा कमांडर अवशालोम पेल्ड यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश देत हे प्रकरण जेरुसलेम जिल्हा केंद्रीय युनिटकडे सोपवले. स्थानिक पोलीस स्टेशन कमांडर चीफ सुपरिंटेंडेंट युवल रुवेन यांनी सांगितले की, या हत्येमागील मुख्य कारण आणि सत्य बाहेर आणण्यासाठी विशेष पथकांद्वारे चौकशी आणि पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरु आहे. या घटनेमुळे इस्त्रायलमध्ये (Israel) राहणाऱ्या भारतीय समुदायात चिंतेचे वातावरण पसरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com