पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेपाळ दौऱ्यावर आहेत. येथे मोदी गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनीला भेट देणार आहेत. तसेच नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांची भेट घेणार आहेत. बुद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध संस्कृती आणि हेरिटेज सेंटरच्या पायाभरणीसाठी आयोजित समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. (PM Narendra Modi to visit Nepal today on occasion of Buddha Purnima)
वेळापत्रकानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक हेरिटेज स्थळ असलेल्या लुंबिनी येथे बुद्ध जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते कनेक्टिव्हिटीच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा करू शकतात. प्रस्तावित योजनेंतर्गत भारताच्या मदतीने कुशीनगर ते लुंबिनी दरम्यान रेल्वेमार्ग बांधला जाणार आहे. तसेच भारतीय बौद्ध स्थळे कपिलवस्तु आणि लुंबिनीला रस्त्याने जोडली जाणार आहेत. या प्रकल्पांवर भारत आणि नेपाळमध्ये बोलणी सुरू आहेत.
भगवान बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनी येथून पंतप्रधान मोदी जगाला शांतीचा संदेश देणार आहेत. यावेळी पंतप्रधान बौद्ध तीर्थक्षेत्रांना रेल्वे आणि रस्त्याने जोडण्याच्या योजनेची घोषणा करू शकतात. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने भारतीय पंतप्रधानांचा नेपाळ दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान मोदी तब्बल चार वर्षांनंतर नेपाळच्या दौऱ्यावर जात आहेत.
सात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्राने सांगितले की, भारतीय पंतप्रधानांच्या लुंबिनी दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये सात करारांवर स्वाक्षरी केली जाईल. यामुळे शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक घट्ट होतील.
देउबा आणि मोदींची चर्चा
लुंबिनीमध्ये पंतप्रधान मोदी आणि देउबा यांची चर्चा होणार आहे. जलविद्युत आणि कनेक्टिव्हिटीसह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर दिला जाईल. इंडियन इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजच्या पायाभरणीलाही मोदी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.