''नमस्कार सर, मला अभ्यास करायचा आहे. कृपया मला मदत करा'' अशी हात जोडून विनंती एका चिमूकल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केली. यानंतर ते अवाकच झाले. बिहारमधील सोनू कुमार नावाच्या एका अकरा वर्षीय मुलाची शिक्षण घेण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. मुख्यमंत्री नितीश कुमार नालंदा जिल्ह्यातील कल्याणबिघा येथे गेले होते. यावेळी या मुलाने त्यांना हात जोडून विनंती केली होती. (The child's struggle for education; Request to Chief Minister )
चिमुकल्याची विनंती ऐकल्यानंतर क्षणभरासाठी नितीश कुमारांना धक्काच बसला. गावातील सरकारी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची तक्रार संबंधित मुलानं मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच आपल्याला खासगी शाळेत प्रवेश मिळवून द्यावा, अशी विनंतीही त्यानं यावेळी केली. चिमुकल्याची अडचण जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला खासगी शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
संबंधित मुलानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं की, “नमस्कार सर, मला अभ्यास करायचा आहे. कृपया मला मदत करा. नीमा कौल येथील सरकारी शाळेत चांगलं शिक्षण कसं द्यायचं, हे तेथील शिक्षकांना देखील कळत नाही,” असं म्हणत त्यानं खासगी शाळेत प्रवेश मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली.11 वर्षीय मुलाचा आत्मविश्वास पाहून मुख्यमंत्री देखील प्रभावित झाले. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना संबंधित मुलाच्या अभ्यासाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.