VIDEO: 'अमेरिका-पाक युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानसोबत!'; राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ, काँग्रेस-आप आक्रमक

Rajasthan BJP Chief Madan Rathore Pakistan Statement: राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे देशाच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे.
Rajasthan BJP Chief Madan Rathore Pakistan Statement
Rajasthan BJP Chief Madan Rathore Pakistan StatementDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Rajasthan BJP Chief Madan Rathore Pakistan Statement: राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे देशाच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेटपणे विधान केले की, जर कधी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध पेटले, तर भारत हा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील, कारण तो आपला शेजारी देश आहे.

मात्र, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत मुद्द्यांचा प्रश्न येतो, तेव्हा आपण नेहमी आपल्या भारतासोबत (India) ठामपणे उभे राहतो, असेही ते म्हणाले. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच विरोधी पक्षांनी भाजपच्या राष्ट्रवादावर थेट सवाल उपस्थित करत चौफेर हल्ला चढवला.

Rajasthan BJP Chief Madan Rathore Pakistan Statement
PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

या वक्तव्यावरुन काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भाजपच्या राष्ट्रवादाच्या व्याख्येवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, दहशतवादी देश असलेल्या पाकिस्तानबद्दल भाजपचे प्रेम पुन्हा एकदा जगासमोर आले. हा तोच पाकिस्तान आहे जो आपल्या जवानांचे आणि नागरिकांचे बळी घेतो. या राष्ट्रविरोधी विधानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह मदन राठोड यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल त्यांनी विचारला.

Rajasthan BJP Chief Madan Rathore Pakistan Statement
Rahul Gandhi Women Statement: 'स्त्री ही कोणाचीही मालकी नाही'; राहुल गांधींच्या विधानापलीकडचा पुरुषसत्ताक व्यवस्थेवरील गंभीर सवाल

दुसरीकडे, आम आदमी पक्षानेही या मुद्द्यावरुन तिखट शब्दांत निशाणा साधत, विरोधकांना 'पाकिस्तानी' आणि 'दहशतवादी' म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा खरा चेहरा आता उघड झाला असून देशद्रोहाची व्याख्या आता कुठे गेली, असा रोखठोक सवाल उपस्थित केला.

Rajasthan BJP Chief Madan Rathore Pakistan Statement
Rahul Gandhi Pune Visit: मुलींनो, जाचक रूढ चौकट तोडा! मनुस्मृतीची विचारधारा उखडून फेकण्याचे राहुल गांधी यांचे आवाहन

चौफेर कोंडी झाल्यानंतर मदन राठोड यांनी आपल्या या विधानावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून ते तोडून-मोडून मांडले गेले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाबद्दल नव्हे, तर क्रिकेट सामन्याच्या संदर्भात हे भाष्य केले होते. एका मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात बोलताना, भारत-पाक सामन्यात भारताचा पराभव झाल्यावर फटाके फोडणारे खरे हिंदुस्तानी नसतात, असा संदर्भ देत त्यांनी अमेरिकेसोबतच्या क्रिकेट मॅचचे उदाहरण दिले होते.

भारत आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर आमचा अजेंडा अगदी स्पष्ट असून दोन देशांच्या एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com