Rahul Gandhi Pune Visit: मुलींनो, जाचक रूढ चौकट तोडा! मनुस्मृतीची विचारधारा उखडून फेकण्याचे राहुल गांधी यांचे आवाहन

Rahul Gandhi Pune Speech: महिलांना कायम पिंजऱ्यात डांबून ठेवणारा ‘हिंदुस्थान’ आम्हाला अजिबात नको,’ अशा शब्दांत खडसावून सांगितले.
Rahul Gandhi Pune Speech
Rahul Gandhi Pune VisitDainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: ‘‘भारतीय महिला ही या देशाची सर्वांत मोठी ताकद आहे. मात्र, त्यांना घाबरवून नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणारी पुरुषसत्ताक व्यवस्था आणि ‘मनुस्मृती’ची बुरसटलेली विचारधारा आता मुळासकट उखडून फेका,’’ असा घणाघात करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट हल्लाबोल केला.

महिलांना कायम पिंजऱ्यात डांबून ठेवणारा ‘हिंदुस्थान’ आम्हाला अजिबात नको,’ अशा शब्दांत खडसावून सांगितले.पुण्यातील ‘एआयएसएसएमएस’ महाविद्यालयात राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी संवाद साधला. त्यांनी काही तरुणींना बोलावून त्यांचे अनुभवही ऐकून घेतले.

Rahul Gandhi Pune Speech
Goa BJP: प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांना दिल्लीत सादर केला अहवाल; भाजपचे निवडणूक धोरण रविवारी

‘...तर मी तुमच्यासोबत बसेन’

आदिवासी समाजातील एका तरुणीने वसतिगृहातील सुविधा, शिक्षण आणि सुरक्षेशी संबंधित प्रश्न मांडल्यानंतर “मला तिथे बोलवा, मी तुमच्यासोबत येऊन बसेन,” असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी १० दिवसांपासून पुण्यात उपोषण करत आहेत. दोन तरुणीही या आंदोलनात सहभागी असून, त्यापैकी एका तरुणीची प्रकृती खालावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mavin Gudinho questions Congress over Jharkhand issue
Rahul Gandhi targets Amit Shah
Sattari waterfall drowning case
Rahul Gandhi On CJP NEET Paper Leak Protest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com