Karnataka Tourism Policy: कर्नाटकची गोव्याला टक्कर! किनाऱ्यांवर शॅक उभारण्यास सरकारची परवानगी; दारु विक्रीचाही मिळणार परवाना

Karnataka Beach Shacks Policy: गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील किनाऱ्यावर शॅक उभारण्यासाठी परवानगी देण्याचा आणि तिथे दारु विक्रीचे परवानेही देण्याचा विचार कर्नाटक सरकारने चालवलेला आहे.
Karnataka Tourism Policy: कर्नाटकची गोव्याला टक्कर! किनाऱ्यांवर शॅक उभारण्यास सरकारची परवानगी; दारु विक्रीचाही मिळणार परवाना
Shacks Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: किनाऱ्यावरील शॅक आणि स्वस्तात मिळणारी दारु हे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचे विशेष आकर्षण असते. सीआरझेड विभागात शॅकना हंगामी परवानगी देता यावी यासाठी सीआरझेड अधिसूचनेतही शॅक्सचा विशेष उल्लेख आहे. आता याला कर्नाटक स्पर्धा करु पाहत आहे.

कर्नाटकची गोव्याला टक्कर!

गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील किनाऱ्यावर शॅक उभारण्यासाठी परवानगी देण्याचा आणि तिथे दारु विक्रीचे परवानेही देण्याचा विचार कर्नाटक सरकारने चालवलेला आहे. कर्नाटकचे पर्यटन संचालक राजेंद्र के व्ही. यांनी मंगळूर येथील एका परिषदेत याविषयी पुन्हा एकदा सांगितले.

Karnataka Tourism Policy: कर्नाटकची गोव्याला टक्कर! किनाऱ्यांवर शॅक उभारण्यास सरकारची परवानगी; दारु विक्रीचाही मिळणार परवाना
Goa Shacks: ..हे तर 'पर्यटक राजदूत'! मंत्री खंवटेंचे सूतोवाच; उर्वरित 30 टक्के शॅक्सना लवकरच परवाने

पर्यटनाला चालना

कर्नाटकाच्या किनारी भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी मध्य विक्रीवरील निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे. गोव्याशी पर्यटनाबाबत स्पर्धा करण्यासाठी याची गरज असल्याचे त्यांनी या परिषदेत नमूद केले आहे. रात्र पर्यटनासाठी कर्नाटकच्या किनारी भागामध्ये पर्यटकांनी मोठ्या संख्येने यावे यासाठी त्यांना विविध आकर्षणे दर्शवली गेली पाहिजेत असे त्यांचे म्हणणे आहे. किनारी भागामध्ये आणखी सोयीसुविधा वाढवण्याचा पर्यटन खात्याचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Karnataka Tourism Policy: कर्नाटकची गोव्याला टक्कर! किनाऱ्यांवर शॅक उभारण्यास सरकारची परवानगी; दारु विक्रीचाही मिळणार परवाना
Goa Shacks: समुद्रप्रेमींसाठी आनंदवार्ता!! पुढच्या आठवड्यात 70 टक्के शॅक्स उघडण्याची शक्यता

शॅकसाठी परवाने

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारने किनारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना किनाऱ्यालगतच्या सरकारी व खासगी जागा शॅक घालण्याचे परवाने देण्यासाठी निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. गोव्यात शॅक घालण्यासाठी राष्ट्रीय किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने सीआरझेड अधिसूचनेत विशेष नोंदी केल्या आहेत. त्याचा आधार घेऊन तशा नोंदी कर्नाटक बाबतही केल्या जावेद यासाठी राज्य सरकार आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रयत्न करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com