

पणजी: म्हादईचे पाणी पचवल्यानंतर कर्नाटकाने कारवार ते भटकळ दरम्यानच्या त्या १६ बेटांवर कर्नाटक सरकारने आपली कायदेशीर मालकी तयार केली आहे. या बेटांच्या सर्वेक्षणानंतर त्या बेटांवरील जमिनींना सर्वे क्रमांक दिले असून त्याची मालकी कर्नाटक सरकारकडे असल्याचे महसुली कागदपत्रे तयार केली आहेत.
कारवारच्या जिल्हा उपायुक्त लक्ष्मी प्रिया यांनी याची कबुली ‘गोमन्तक’च्या या प्रतिनिधीशी बोलताना दिली. त्यांनी सांगितले, की ही बेटे कर्नाटकच्या सागरी हद्दीत आहेत. कोणतीही नवीन जमीन जिच्यावर कोणी खासगी व्यक्तीने दावा केलेला नाही ती सरकारी मालकीची होती. याच नियमानुसार बेटांवरील जमीन ही कर्नाटक सरकारच्या मालकीची आहे. त्याची महसुली नोंद करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.
बेटांवरील जमिनींना सर्वे क्रमांक देण्यात आले. त्या बेटांचे नामकरण करण्याचे काम सुरू आहे. मच्छीमार या बेटांना ज्या नावांनी ओळखतात तीच नावे या बेटांना देण्यात आली आहेत. महसुली कागदपत्रांत तशी नोंद करण्यात आली आहे. बेटांचा पर्यटनासाठी विकास करण्याचा आराखडा आखल्याचे सांगून त्यांनी सांगितले की, या बेटांवर कोणी अतिक्रमण करू नये यासाठी पुरेपूर दक्षता घेतली जात आहे.
कर्नाटक किनारी पोलिसांनी त्या बेट परिसरात गस्तही घालणे सुरू केले आहे. कर्नाटकाच्या किनाऱ्यापासून १० सागरी मैलांवर ही बेटे असल्याने ती कर्नाटकाच्या सागरी हद्दीत असल्याने त्या बेटांवर नैसर्गिकपणे कर्नाटकाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना सर्वे क्रमांक देणे, नामकरण करणे हा आमचा अधिकार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.