CM Pramod Sawant: राजस्थान हे काँग्रेसचे एटीएम; तिथून येणाऱ्या पैशांवरच चालतो काँग्रेस पक्ष...

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची राजस्थानातील काँग्रेस सरकारवर टीका
Goa CM Pramod Sawant on Rajasthan's congress Govt
Goa CM Pramod Sawant on Rajasthan's congress GovtDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

CM Pramod Sawant On Rajasthan Congress: देशात काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी राजस्थान राज्य सरकार हे काँग्रेसचे एटीएम म्हणून काम करत आहे. राजस्थानमधूनच काँग्रेस पक्षाला पैसा पुरवला जातो, अशी टीका असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

शुक्रवारी भाजपच्या परिवर्तन यात्रेसाठी ते राजस्थानमध्ये होते. त्यावेळी भिवडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, राजस्थान हे काँग्रेस पक्ष चालवण्यासाठीचे एटीएम बनले आहे. राजस्थानातूनच काँग्रेसला पैसा पोहोचतो. त्यामुळेच सर्वसामान्यांना येथे भाजपचे सरकार हवे आहे. सर्वसामान्य जनतेला हे कुशासनाचे सरकार उलथून टाकायचे आहे.

Goa CM Pramod Sawant on Rajasthan's congress Govt
Nagpur-Margao Railway: खुशखबर! नागपूर-मडगाव रेल्वेगाडीच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; गाडीलाही मुदतवाढ

पैशाच्या भ्रष्टाचाराबाबत ऐकले होते, मात्र येथे भ्रष्टाचाराचे सोने सरकारी कार्यालयातच सापडत आहे. राजस्थानमध्ये खाण घोटाळा जोरात सुरू आहे. कारण सरकारला खाणींमधून मोठा महसूल मिळतो. भाजप निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करते.

पण, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेत येण्यापुर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली का?

सावंत म्हणाले की, राजस्थानमध्ये गेल्या 5 वर्षांत 19 वेळा पेपर फुटले. राजस्थान सरकार हे पेपरफुटीचे सरकार बनले आहे. येथे सरकारमधील मंत्र्यानेच पेपर फोडले. येथे प्रत्येक सरकारी गोष्टीत घोटाळा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस सरकार उलथवून टाका.

Goa CM Pramod Sawant on Rajasthan's congress Govt
Narendra Modi Net Worth: नरेंद्र मोदींकडे किती संपत्ती आहे? पंतप्रधान म्हणून त्यांना किती पगार मिळतो? जाणून घ्या सविस्तर

मुख्यमंत्री सावंत त्यांनी राजस्थानमधील दलितांवरील अत्याचाराच्या घटनांचाही उल्लेख केला. तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांबाबतही माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

दरम्यान, भाजपच्या परिवर्तन यात्रेसाठी यापुर्वी मुख्यमंत्री सावंत हे मध्य प्रदेशातही गेले होते. तिथे त्यांनी विविध सभा, रॅलींमध्ये सहभाग घेतला होता. तसेच मध्य प्रदेशातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर सडकून टीका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Politics
Goa Congress Party Registration Case
Goa Congress Party Registration Dispute
Goa Rakshan Yatra
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com