Nagpur-Margao Railway: खुशखबर! नागपूर-मडगाव रेल्वेगाडीच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; गाडीलाही मुदतवाढ

मध्य भारतातून थेट गोव्यात येणे सोयीस्कर
Nagpur-Margao Railway
Nagpur-Margao RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Nagpur-Margao Railway: नागपूर-गोवा-नागपूर या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खूष खबर आहे. या गाडीला मुदतवाढ देण्यासोबतच मध्य रेल्वेकडून या गाडीच्या तब्बल 52 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

ही रेल्वे नागपूर ते मडगाव आणि पुन्हा मडगाव ते नागपूर अशी धावते. या गाडीमुळे थेट मध्यभारतातून गोव्यात येणे सोयीस्कीर होते. नागपूर हे भारताचे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती असलेले ठिकाण आहे. त्यामुळे हा मोठा प्रवास या रेल्वेगाडीने सोपा केला आहे.

Nagpur-Margao Railway
Panaji Solar City: पणजीला सोलर सिटी बनविण्यासाठी 541 कोटी रूपये खर्च करणार सरकार

गाडी क्रमांक 01139 नागपूर - मडगाव (गोवा) विशेष द्वि-साप्ताहिक रेल्वेगाडी आधी 30 सप्टेंबरपर्यंत चालणार होती. ती आता 30 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. या कालावधीत तिच्या 26 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे मडगाव-नागपूर गाडीच्याही 31 डिसेंबरपर्यंत 26 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, विविध मार्गावर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने सहा विशेष रेल्वेगाड्यांना नियोजित मुदतीनंतरही चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय त्यांच्या एकूण 212 फेऱ्याही वाढविल्या आहेत. त्यात नागपूर-मडगाव गाडीचाही समावेश आहे.

Nagpur-Margao Railway
Goa Milet Farming: राज्यात बाजरी लागवडीखालील क्षेत्रात दुप्पट वाढ; यंदा 50 हजार हेक्टरवर लागवड

प्रवाशांची गर्दी होऊन सणासुदीच्या दिवसांत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांची मुदत तसेच फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, गाड्यांची वेळ, डब्यांची (कोच) रचना तसेच थांबे यात कसलाही बदल करण्यात आला नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com