PM Narendra Modi Net Worth and Salary: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच 73 वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. 2014 पासून ते सतत देशाच्या सत्तेची धुरा सांभाळत आहेत. मोदींची संपत्ती किती आहे आणि पंतप्रधान म्हणून त्यांना किती पगार मिळतो? जाणून घेऊया...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेअर्समध्ये गुंतवणून नसून पोस्टात मात्र आहे. तसेच त्यांची एलआयसी पॉलिसीही आहे.
मोदींचा पगार
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) गतवर्षी पंतप्रधान मोदींच्या कमाईबाबत, निवासाबाबतची माहिती प्रसिद्ध केली होती. पंतप्रधान म्हणून मोदींना वर्षाला सुमारे 20 लाख रुपये इतका पगार मिळतो. त्यांचा मूळ पगार सुमारे 2 लाख रुपये आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त विविध भत्त्यांचाही समावेश होतो.
मोदींची संपत्ती
मार्च 2022 पर्यंत पंतप्रधान मोदींकडे किती स्थावर आणि जंगम संपत्ती होती याचा तपशील PMO ने जाहीर केला होता. त्या माहितीनुसार मोदींकडे एकूण 2.23 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. त्यातील बहुतांश बँकेत आहेत. तर मोदींकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.
जमिन केली दान
गुजरातमधील गांधीनगर येथे मोदींच्या मालकीची जमीन होती, जी त्यांनी दान केली होती. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ऑक्टोबर 2002 मध्ये निवासी जमीन खरेदी केली होती. या जमिनीतील ते तिसरे पार्टनर होते. परंतु आता त्यावर त्यांची मालकी नाही. कारण आपला हिस्सा त्यांनी दान केला.
वाहन नाही
एका अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणत्याही प्रकारचे बाँड, स्टॉक किंवा म्युच्युअल फंड (MF) मध्ये कोणतीही गुंतवणूक नाही. याशिवाय त्यांच्याकडे स्वत:चे कोणतेही वाहन नाही.
सोन्याच्या चार अंगठ्या
तथापि, मार्च 2022 पर्यंतच्या मालमत्तेच्या आकडेवारीनुसार, त्याच्याकडे निश्चितपणे 1.73 लाख रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या होत्या. त्यांच्या सेव्हिंग्जबद्दल बोलायचे तर पोस्टात त्यांनी 9 लाख 05 हजार 105 रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) घेतली आहेत आणि 1 लाख 89 हजार 305 रुपयांची जीवन विमा पॉलिसी त्यांच्याकडे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.