Bageshwar Dham: अंधश्रद्धा पसरवण्याविरोधात कायदा काय म्हणतो? धीरेंद्र शास्त्रीला किती होऊ शकते शिक्षा...

Dhirendra Shastri: मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री सध्या चर्चेत आहेत. नागपुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शास्त्रींवर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे.
Dhirendra Shastri
Dhirendra ShastriDainik Gomantak
Published on
Updated on

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री सध्या चर्चेत आहेत. नागपुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शास्त्रींवर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी धीरेंद्र शास्त्री यांनी रायपूरमध्ये अनेक माध्यमांसमोर चमत्कार घडवल्याचा दावा केला.

दरम्यान, एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरच्या काकांचे नाव घेऊन मंचावरुन हाक मारली. आता हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धीरेंद्र शास्त्रींचे अनुयायी याला चमत्कार मानतात. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या (Maharashtra) जादूटोणाविरोधी कायद्याच्या भीतीपोटी ते नागपूरहून रायपूरला गेल्याचे शास्त्रींचे विरोधक सांगत आहेत.

Dhirendra Shastri
Brijbhushan Sharan Singh: 'माझ्या हातून एकच हत्या झाली...', ब्रिजभूषण यांनी ऑन कॅमेरा दिली कबुली

अशा स्थितीत, अंधश्रद्धा पसरवण्याबाबत कायदा काय म्हणतो? यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याला किती शिक्षा होऊ शकते? दोषींवर काय कारवाई होऊ शकते? महाराष्ट्राचा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काय आहे? धीरेंद्र शास्त्री यांच्याशी संबंधित संपूर्ण वाद काय? धीरेंद्र शास्त्री याआधी कोणत्या प्रकारच्या वादात अडकले आहेत? त्यांच्या चमत्काराच्या दाव्यांबद्दल तज्ञ काय म्हणतात? ते जाणून घ्या…

अंधश्रद्धा पसरवण्याबाबत काय कायदा आहे?

सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) वकील चंद्र प्रकाश पांडे म्हणतात की, भारतात अंधश्रद्धेबाबत कोणताही विशिष्ट केंद्रीय कायदा नाही. 2016 मध्ये लोकसभेत प्रिव्हेन्शन ऑफ विच-हंटिंग विधेयक मांडण्यात आले, परंतु ते मंजूर झाले नाही. मात्र, वेगवेगळे कायदे आहेत, ज्याद्वारे त्यावर बंदी घालण्याचे काम केले जाऊ शकते.

Dhirendra Shastri
Brijbhushan Sharan Singh अडकले, लैंगिक आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन

पांडे पुढे सांगतात, 'सध्या अंधश्रद्धेमुळे एखाद्याचा खून झाल्यास, आरोपींवर आयपीसी (भारतीय दंड संहिता) कलम 302 (हत्याची शिक्षा) अंतर्गत कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे कलम 295A अशा पद्धतींना परावृत्त करते. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A(h) भारतीय नागरिकांसाठी वैज्ञानिक विचार, मानवतावाद आणि सुधारणेची भावना विकसित करणे हे मूलभूत कर्तव्य ठरवते.

याशिवाय, चमत्कारिक किंवा दैवी मार्गाने कोणताही रोग बरा करण्याचा दावा करणाऱ्यांवर ड्रग्स अॅण्ड मॅजिक रेमेडीज एक्ट 1954 अन्वये कारवाई करण्याची तरतूद आहे. यातून अंधश्रद्धेला आळा घालण्याचे कामही केले जाते.

Dhirendra Shastri
Shraddha Murder Case: मोठी बातमी! श्रद्धाच्या हत्येची आफताबने दिली कबुली, म्हणाला...

कोणत्या राज्यांनी कायदे केले आहेत?

सध्या बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, राजस्थान, आसाम, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये अंधश्रद्धा रोखण्यासाठी कायदे करण्यात आले आहेत. जादूटोणा रोखण्यासाठी, स्त्रीला डायन म्हणून लेबल लावणारे आणि अत्याचार, अपमान आणि महिलांची हत्या रोखण्यासाठी कायदा करणारे बिहार हे पहिले राज्य आहे. त्याला 'द प्रिव्हेन्शन ऑफ विच (विच) प्रॅक्टिसेस ऍक्ट' असे नाव देण्यात आले. ऑक्टोबर 1999 पासून हा कायदा लागू आहे.

तसेच, महाराष्ट्रातही प्रदीर्घ लढ्यानंतर यावर कायदा करण्यात आला. 2013 मध्ये, महाराष्ट्र मानवी बळी आणि इतर अमानवी कृत्ये प्रतिबंध आणि निर्मूलन कायदा संमत करण्यात आला. याद्वारे राज्यात अमानुष प्रथा आणि काळी जादू आदींवर बंदी घालण्यात आली.

Dhirendra Shastri
Swati Maliwal: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग!

दुसरीकडे, या कायद्याचा एक भाग विशेषत: आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणार्‍या 'गॉडमॅन'ने केलेल्या दाव्यांशी संबंधित आहे. पं.धीरेंद्र शास्त्री यांच्यावर या कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर पोलिसांकडे अर्जही दिला आहे.

महाराष्ट्राच्या कायद्यानुसार दोषींना काय शिक्षा आहे?

मानवी बळी आणि इतर अमानवी कृत्ये प्रतिबंध आणि निर्मूलन कायद्यांतर्गत शास्त्री यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कायद्यात एकूण 12 कलमे आहेत, जी वेगवेगळे गुन्हे ओळखतात. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास किमान सहा महिने आणि कमाल सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

Dhirendra Shastri
Watch Video: हे 'मौलाना' बंदूकीच्या गोळ्या झाडून भूत मारतात, पाहा चक्रावून टाकणारा व्हिडिओ

याशिवाय, दंडही आकारला जाऊ शकतो. पाच हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत दंडाची तरतूद आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आणि दखलपात्र आहे.

आकडे काय सांगतात?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा वर्षांत जादूटोण्यामुळे एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 2012 ते 2021 दरम्यान, जादूटोण्यामुळे देशभरात 1,098 लोकांचा मृत्यू झाला. एकट्या 2021 मध्ये देशभरात जादूटोण्याच्या प्रकरणात एकूण 68 हत्या झाल्या.

गेल्या वर्षी, ऑक्टोबरमध्येच तांत्रिक मोहम्मद शफीने केरळमधील कोची येथे जादूटोणा करण्यासाठी दोन महिलांचा बळी दिला होता. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

Dhirendra Shastri
Watch Video : द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात TMC मंत्र्याची आक्षेपार्ह टिप्पणी; भाजप संतप्त, पाहा व्हिडिओ

तज्ञ काय म्हणतात?

मानसशास्त्रज्ञ डॉ. हेमा खन्ना म्हणतात, 'श्रद्धेला स्थान आहे, परंतु अंधश्रद्धेला नाही. तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकता, परंतु जर कोणी त्याच्या नावाने अलौकिक शक्तीचा दावा करत असेल तर त्याच्यापासून दूर रहा. रोगावर विज्ञानाने उपचार केले जातात. यावर उपचार आहेत. झाडू फुंकून कोणी बरा होत नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com