Swati Maliwal: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग!

Swati Maliwal News: दिल्लीच्या महिला अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे.
Swati Maliwal
Swati Maliwal Dainik Gomantak
Published on
Updated on

Swati Maliwal News: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. बुधवारी रात्री दिल्लीच्या रस्त्यावर आपला विनयभंग झाल्याचे ट्विट त्यांनी गुरुवारी केले. स्वाती मालीवाल म्हणाल्या, ''दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर परिस्थितीची कल्पना करा.''

स्वाती मालीवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'काल रात्री उशिरा मी दिल्लीतील (Delhi) महिला सुरक्षेच्या स्थितीची पाहणी करत होते. यातच, एका ड्रायव्हरने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला, जेव्हा मी त्याला पकडले तेव्हा त्याने माझा हात ओढला. दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील, तर परिस्थितीची कल्पना करा.' एम्सजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने त्यांना 10 ते 15 मीटरपर्यंत ओढले.

Swati Maliwal
राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, कार चालवणाऱ्या एका व्यक्तीने स्वाती मालीवाल यांचा विनयभंग केला. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, हरीश चंद्र नावाच्या ड्रायव्हरने अचानक खिडकी खाली केली आणि स्वाती मालीवाल यांना ओढण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला पण लगेच नंतर यू-टर्न घेऊन परत आला.

दुसरीकडे, कांजवाला हिट-अँड-रन प्रकरणानंतर हे प्रकरण काही आठवड्यांनंतर समोर आले आहे, जिथे 20 वर्षीय अंजली सिंगला 12 किलोमीटरपर्यंत ओढत नेले होते. 1 जानेवारी रोजी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करणारी अंजली तिच्या मैत्रिणी निधीसोबत स्कूटरवरुन जात असताना कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली.

Swati Maliwal
Kanjhawala Death Case : कांजवाला घटनेची मोठी बातमी! प्रकरणातील सहावा आरोपी आशुतोष पोलिसांच्या अटकेत

फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, अंजलीचा पाय गाडीच्या पुढच्या डाव्या चाकात अडकला आणि तिला 12 किलोमीटरपर्यंत ओढत नेले. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर निर्दोष हत्येचा आरोपही ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com