Brijbhushan Sharan Singh: 'माझ्या हातून एकच हत्या झाली...', ब्रिजभूषण यांनी ऑन कॅमेरा दिली कबुली

Brijbhushan Sharan Singh: यूपीच्या कैसरगंजमधील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
Brijbhushan Sharan Singh
Brijbhushan Sharan SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Brijbhushan Sharan Singh: यूपीच्या कैसरगंजमधील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनेश फोगट, बजरंग पुनिया यांच्यासह 30 हून अधिक कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर सलग तिसऱ्या दिवशी धरणे आंदोलन देत आहेत.

दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांचा वादांशी जुना संबंध आहे. ते गोंडा आणि कैसरगंजमधून सहा वेळा खासदार आहेत, त्यापैकी भाजपकडून (BJP) पाच वेळा तर सपाकडून एकदा विजय मिळवला आहे. बाहुबली इमेज असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आले होता.

Brijbhushan Sharan Singh
Brij Bhushan Singh: खेळाडूच्या कानशिलातच वाजवतानाचा Video व्हायरल, नक्की वाचा नेमकं प्रकरण

तसेच, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) गुंडांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली ब्रिजभूषण यांनी तुरुंगवासही भोगला आहे. मात्र, नंतर या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. शिवाय, ब्रिजभूषण यांनी ऑन कॅमेरा मुलाखतीत कबुली दिली होती की, आपल्या हातून खून झाला होता.

ब्रिजभूषण यांनी ऑन कॅमेरा हत्येची कबुली दिली आहे

गेल्या वर्षी यूपी विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका मुलाखतीत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कॅमेर्‍यासमोर कबुली दिली होती की, आपण ही हत्या केली होती. 'ललनटॉप'शी बोलताना ब्रिजभूषण म्हणाले होते की, 'मी माझ्या आयुष्यात एक खून केला आहे. लोक काहीही म्हणतील, ज्याने रवींद्रचा खून केला त्याला मी गोळी झाडली.' रवींद्र हे ब्रिजभूषण यांचे मित्र होते. या प्रकरणाचा संदर्भ देत ब्रिजभूषण यांनी आपण हत्या केल्याचे सांगितले.

Brijbhushan Sharan Singh
Brij Bhushan Singh: कुस्ती महासंघांच्या अध्यक्षांविरोधात दिग्गज कुस्तीपटू जंतरमंतरवर, लैंगिक शोषणाचा आरोप

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पंडित सिंह बद्दल बोलताना ब्रिजभूषण सांगतात की, विनोद कुमार हे 'पंडित' यांचे बंधू होते, ज्यांचे नाव रवींद्र सिंह होते. रवींद्र, अवधेश प्रताप सिंग आणि मी कॉमन मित्र होतो. मी कॉन्ट्रॅक्टिंग लाइनमध्ये आलो तेव्हा काम पाहण्यासाठी त्यांची नियुक्ती केली होती. आम्ही या उद्योगात समान भागीदार होतो. मी माझ्या आयुष्यात एकच हत्या केली आहे. ज्याने रवींद्रची हत्या केली होती. त्यावेळी काय परिस्थिती होती याचे लल्लू सिंह साक्षीदार आहेत. यानंतर आम्ही संपूर्ण कारभार पंडित सिंग यांच्याकडे सोपवला होता.'

ब्रिजभूषण यांच्यावर टाडा लावण्यात आला होता, त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम कासकरची हत्या करणाऱ्या गवळी टोळीतील शूटर्संना ज्यांनी ठार मारले त्यांनाच आश्रय दिल्याचा आरोप ब्रिजभूषण यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांच्यावर टाडा लावण्यात आला आणि त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती.

Brijbhushan Sharan Singh
Manpreet Singh Badal: पंजाब काँग्रेसला मोठा धक्का, मनप्रीत सिंग बादल यांचा भाजपमध्ये प्रवेश

यादरम्यान प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. परंतु त्यात त्यांना क्लीन चिट देण्यात आली. न्यायालयाने ब्रिजभूषण यांची निर्दोष मुक्तता केली. याशिवाय, ब्रिजभूषण यांच्यावर माजी मंत्री विनोद सिंह उर्फ ​​पंडित सिंह यांच्यावर खुनी हल्ल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांचीही नंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com