Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमधील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने नॉर्को टेस्टमध्ये श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. आज आफताबची दोन तास नार्को टेस्ट चालली. यात त्याने श्रद्धाची हत्येची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे त्यांने सांगितले. यापूर्वी आफताबने पॉलिग्राफ टेस्टमध्येही आपला गुन्हा मान्य केला होता. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली होती.
श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने आपला मोबाईल ओएलएक्सवर विकला. दिल्लीतील एका तरुणानेच हा मोबाइल ओएलएक्सवरून खरेदी केला. तरूणाने सांगितले की, आफताबने त्याला मोबाईल फॉरमॅट करून दिला होता. मोबाईल सील करून मेहरौली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे. लवकरच मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला जाईल. तथापि, फोन अनेक वेळा फॉरमॅट केला गेला आहे. त्यामुळे फोनमधून डिलीट केलेल्या गोष्टी शोधणे अवघड आहे.
श्रद्धाच्या हत्येनंतर 30 मे रोजी आफताब नवीन मैत्रिणीच्या संपर्कात आला होता. आफताबची नवी जोडीदार मानसोपचारतज्ज्ञ आहे. ऑक्टोबरमध्ये ती दोनदा आफताबच्या घरी गेली होती, पण आफताबच्या घरात खून करून मृतदेहाचे तुकडे ठेवल्यात असे तिला कधीच वाटले नाही. अशी माहिती तिने दिल्ली पोलिसांना दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.