Sacorda Road Dainik Gomantak
Video

Sacorda News: साकोर्डातील नव्याने हॉटमिक्स केलेला रस्ता पुराच्या पाण्यात गेला वाहून!

Sacorda Road: राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसानं दाणादाण उडवली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणांहून पडझडीच्या घटना समोर येतायेत.

Manish Jadhav

राज्यात पुन्हा पावसानं दाणादाण उडवायला सुरुवात केली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणांहून पडझडीच्या घटना समोर येतायेत. म्हापसा, डिचोली येथे पावसानं हाहाकार उडवला आहे. यातच, तीन महिन्यांपूर्वी (मे महिन्यात) हॉटमिक्सिंग केलेला सावर्डे मतदारसंघांतील मधलावाडा साकोर्ड्यातील रस्ता रगाडा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला. सध्या या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून साकोर्डामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दरम्यान, रस्ता उखडल्यानंतर स्थानिकांनी सरकारवर रोष व्यक्त केला. साकोर्डात इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे रस्ते बनवण्यात आल्याचे यावेळी स्थानिकांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता निकृष्ट दर्जाचे हॉटमिक्सिंग झाल्याचा आरोप करत स्थानिकांनी कंत्राटदाराच्या चौकशीची मागणीही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Goa: प्रसिद्ध पर्यटनस्थळ मिनी गोवा येथे चार शालेय मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला

Ganesh Chaturthi: 'जयदेव.. जयदेव'! गावागावांत घुमतोय आरतीचा निनाद; भजनाचे स्‍वर अन्‌ फुगड्यांच्‍या ताल

Matoli: 'यंदाच्या वर्षी नवीन काय'? दुर्मिळ फळांची-वनस्पतींची, औषधी गुणधर्मांची लाखमोलाची 'माटोळी'

Goa Live Updates: माटोळीत साकारले ऑपरेशन सिंदूर

Fatorda: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! बेकायदेशीर मासळी विक्रीमुळे परिसर दुर्गंधीमय; डासांची पैदास वाढली

SCROLL FOR NEXT