Sachin Tendulkar Goa Dainik GOmantak
Video

Sachin Tendulkar Goa: गोव्यात 'सचिन... सचिनचा' गजर! मास्टर ब्लास्टरने विद्यार्थ्यांना दिला खास संदेश; Video

Sachin Tendulkar In Goa: ‘अजि म्‍या सचिन तेंडुलकर पाहिला’ अशी भावना ओसंडून वाहत होती. औचित्‍य होते, क्रीडा आंगण बहुद्देशीय प्रकल्‍पाच्या उद्‍घाटनाचे!

Sameer Panditrao

काणकोण: वेळ : दुपारी बाराची. स्‍थळ : मल्लिकार्जुन विद्यालयाचे आवार. डोक्‍यावर रणरणते ऊन. त्‍यामध्‍ये किमान दोन हजार लोक डोळ्यांत चैतन्‍य एकवटून, मनी कुतूहल बाळगून एकमेव उघड्या गेटकडे टक लावून पाहात होते. पंधरा मिनिटांनी ‘तो’ क्षण आलाच. गेटसमोर जीए ०९ ए : १३१३ क्रमांकाची ‘बीएमडब्‍ल्‍यू’ उभी राहिली आणि क्रिकेटचा देव अवतरला... आबालवृद्धांच्या आनंदाला पारावार नव्‍हता, सारे कमालीचे सुखावले.

‘अजि म्‍या सचिन तेंडुलकर पाहिला’ अशी भावना ओसंडून वाहत होती. औचित्‍य होते, क्रीडा आंगण बहुद्देशीय प्रकल्‍पाच्या उद्‍घाटनाचे! पदाधिकारी सचिनला घेऊन शाळा कार्यालयात घेऊन आले. भारतरत्‍न सचिनच्‍या आगमनाने वातावरण अधिकच प्रासादिक बनले. आदरातिथ्‍यासाठी तेलविरहित खाद्यपदार्थ आयोजकांनी समोर मांडले होते. त्यामध्ये पातोळ्या, उकडीचे मोदक, द्रोण व घरगुती भाजलेल्या काजू बियांचा समावेश होता. गोवन पाहुणचाराने सचिन भारावला. तेथून थेट मोर्चा वळला व्‍यासपीठाकडे. टाळ्यांच्‍या गजरात उद्‍घाटनाचा सोहळा झाला आणि सचिनने हलक्‍या आवाजात संबोधन सुरू केले. ‘उत्तुंग स्‍वप्‍ने पाहा, ती साकारण्‍यासाठी कठोर परिश्रम करा’ अशी त्‍याची साद अनेकांना भारावून गेली. अध्यक्ष शांबा देसाई यांच्या हस्ते सचिनला लाकडाची अंबारी भेट देण्यात आली. चाररस्ता येथील सेंत्रो प्रोमोतर द इस्त्रूसांव संस्थेच्या श्री मल्लिकार्जुन विद्यालय व संलग्न शैक्षणिक शाखांच्या कला-क्रीडा बहुउद्देशीय सभागृहाचे उद्‍घाटन यादगार ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रतन टाटांच्या लाडक्यानं वेधलं लक्ष! सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या चर्चमध्ये ‘गोवा’ची उपस्थिती ठरली भावूक; Watch Video

भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

Abrar Ahmed Controversy: "टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडूला मारायचंय..."; 'जा जा जा' करणारा पाकिस्तानचा खेळाडू पुन्हा वादात, कोणाला दिली धमकी?

'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न

"जेवढं अंतर जास्ती, तेवढं लग्न यशस्वी", 58व्या वर्षी अरबाज खानला 'कन्यारत्न'; शूरा खानचं वय काय?

SCROLL FOR NEXT