Restricted Water Supply Dainik Gomantak
Video

Restricted Water Supply: तिसवाडी आणि फोंड्याला पाणीटंचाईचा फटका! 13 आणि 14 मे रोजी 'या' कारणामुळे पाणी पुरवठा मर्यादित

Restricted water supply Tiswadi Ponda: तिसवाडी तालुका आणि फोंडा तालुक्यातील काही भागांतील रहिवाशांना येत्या १३ आणि १४ मे रोजी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Sameer Amunekar

तिसवाडी तालुका आणि फोंडा तालुक्यातील काही भागांतील रहिवाशांना येत्या १३ आणि १४ मे रोजी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिनीच्या तातडीच्या देखभालीसाठी आणि नवीन जोडणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाणी पुरवठा मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह सरकारी संस्थांनाही पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाईपलाईनच्या जोडणीचे काम

मिळालेल्या माहितीनुसार, सेंट फ्रान्सिस झेवियर चॅपलजवळ ७०० मिमी आणि ६०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिन्यांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पाणीपुरवठा पायाभूत सुविधा अधिक मजबूत आणि सुव्यवस्थित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या तांत्रिक कामामुळे दोन दिवस पाणीपुरवठा पूर्ण दाबाने होऊ शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT