विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'लिगर' रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत आणि लवकरच चाहत्यांची प्रतिक्षा देखील संपणार आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे आणि आताही स्टार कास्ट पूर्ण उत्साहाने त्याचे देशभर प्रमोशन करताना दिसून येत आहेत. अलीकडेच, पुरी जगन्नाध दिग्दर्शक यांच्या ट्विटरवर एक नवीन इमोजी दिसून आला, ज्याबद्दल स्वतः लीगरच्या दिग्दर्शकाने पोस्टद्वारे माहिती दिली आहे. (Vijay Deverakonda-Ananya Panday film Liger was given a big gift by Twitter)
'Liger' च्या निर्मात्यांना ट्विटर इमोजी मिळाल्याने आनंद झाला
पुरी जगन्नाध दिग्दर्शित चित्रपटाबाबत विजय देवरकोंडाने एका पोस्टमध्ये म्हटले की, ‘Liger emoji is yours.’ त्याने #Liger, #WaatLagaDenge आणि #LigerHuntBegins असे तीन हॅशटॅग देखील दिले आहेत. अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती चार्मी कौरने देखील चाहत्यांसह लीगरचे ट्विटर इमोजी शेअर केले आहे.
त्यांनी ट्विट केले, 'प्रिय ट्विटर परिवार, तुम्हा सर्वांसाठी एक मोठे सरप्राईज आहे. #LIGER, #WaatLagaDenge, #LigerHuntBegins!' या चित्रपटाचे इमोजी पाहून निर्मात्यांना आनंद झाला असेल, परंतु देवरकोंडा यांच्या पोस्टखाली अनेक लोक पुन्हा-पुन्हा बॉलिवूड बहिष्कार लिहित आहेत.
Twitter च्या 'Liger'ने प्रेक्षकांची आवड निर्माण केली
'Liger' ला ट्विटर कडून मिळालेल्या अधिकृत इमोजीने विजय देवरकोंडाच्या काही चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता आधीकच वाढली आहे, तर अनेकांनी तो पाहू नये असेही म्हटले आहे. तर एका यूजरने लिहिले की, माफ करा भाऊ, मी हा चित्रपट पाहणार नाही. अमेरिकेचा दिग्गज बॉक्सर माइक टायसनही या चित्रपटात दिसून येणार आहे.
यात काही हाय ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्स दाखवण्यात येणार असून प्रेक्षकांना नक्कीच त्याचा आनंद मिळणार आहे. या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली ते म्हणजे, करण जोहर बनवत असल्याने या बॉलीवूडच्या बहिष्काराच्या ट्रेंडमध्ये, जोहरने रिलीजबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
हिंदीच्या आधी साऊथमध्ये एक दिवस आधी रिलीज होणार 'लिगर'
वृत्तानुसार, करण जोहर हिंदीच्या एक दिवस आधी Liger दक्षिण भारतात रिलीज करण्याची तयारी मध्ये आहे. साऊथच्या चांगल्या प्रतिक्रिया आणि कलेक्शननंतर हिंदी प्रेक्षकांमध्येही चांगलीच उत्सुकता वाढेल, असे सांगितले जात आहे. या दिवसांमध्ये बॉलीवूडमधील मोठ्या बजेटची फ्लॉप असल्याचे दिसून येत आहे.
लाल सिंग चड्ढा या चित्रपटाला पाहिल्यानंतर प्रेक्षक एकापाठोपाठ एक बॉलिवूडवर बहिष्कार टाकत आहेत तर अशा परिस्थितीत करण जोहर एक दिवस आधी साऊथमध्ये रिलीज करत असल्याचं बोललं जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.