सिरियल किलरला शोधात अक्षय कुमार, 'Cuttputlli'च्या टीझर नंतर आज होणार ट्रेलर आऊट

'खतरो के खिलाडी' फेम अक्षय कुमारचा आगामी चित्रपट बॅाक्स ऑफिसवर धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.
Cuttputlli poster
Cuttputlli posterTwitter
Published on
Updated on

Cuttputlli Teaser: 'खतरो के खिलाडी' फेम अक्षय कुमारचा आगामी चित्रपट बॅाक्स ऑफिसवर धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमारचा एक चित्रपट प्रदर्शित झाला की, दुसरा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार असतो हे त्याच्या चाहत्यांना माहित आहे. यावर्षी आतापर्यंत अक्षय कुमारचे तीन चित्रपट रिलीज झाले आहे , मात्र हे चित्रपट काही खास कमाल दाखवू शकले नाही. अक्षयचे एका वर्षात 5 ते 6 चित्रपट प्रदर्शित होतात. त्यापैकी काही चालतात तर काही आपटतात.

Cuttputlli poster
Alia Pregnancy Fashion: गरोदरपणातही आलियाचा फॅशन ट्रेंड जोरात, बेबी बंप लपवण्यासाठी...

दुसरीकडे , कटपुतली चित्रपटाचा टीझर रिलीजकरून त्याच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळाले आहे. टीझरमध्ये अक्षय कुमारचे चित्रपटातील फोटो दाखवण्यात आलेय. हा चित्रपट एक क्राईम थ्रिलर असून ज्यामध्ये अक्षय कुमार सीरियल किलरचा शोधात दिसत आहे. यात अक्षय एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यात त्याला एका मिशनवर पाठवण्यात आल्याते दाखवण्यात आले आहे. हे मिशन पुर्ण करण्यासाठी तो वेगळी रणनीती आखतो आणि याच सीरिअल किलरच्या शोधात, "शक्तीचे नाही , तर सीरियल किलरसोबत मनाचे खेळ खेळले पाहिजेत," असा डायलॉग मारतो.

तसेच , या टीझरसोबतच चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2 सप्टेंबर 2022 रोजी डिजनी प्लस हॅाटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. याचसोबत प्रीमियरची तारीखदेखील समोर आली आहे. "हा खेळ शक्तीचा नसून डोक्याचा आहे, आणि या मनाच्या खेळात तुम्ही आणि मी सगळे कटपुतली आहोत," असे कॅप्शन देत टिझरची माहिती दिली आहे. यात आपल्याला अक्षय कुमार सोबत रकुलप्रित सिंह दिसणार आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com