Vedanta Madhavan won a silver medal in the men's 1500m freestyle Dainik Gomantak
मनोरंजन

आर माधवनचा मुलगा वेदांतची डॅनिश ओपनमध्ये उत्तम कामगिरी; रौप्य पदकाचा मानकरी

वेदांत माधवनने पुरुषांच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

दैनिक गोमन्तक

अव्वल भारतीय जलतरणपटू साजन प्रकाशने डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे झालेल्या डॅनिश ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून हंगामाची सुरुवात केली. या वर्षीच्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत असलेल्या प्रकाशने शुक्रवारी रात्री 1.59.27 सेकंदांची वेळ नोंदवली.

तत्पूर्वी, केरळच्या जलतरणपटूने हीटमध्ये 2.03.67 सेकंदांची वेळ नोंदवून 'अ' फायनलसाठी पात्रता मिळवली होती. दोन वेळचा ऑलिम्पियन प्रकाश म्हणाला, "या महिन्यात आमच्याकडे काही स्पर्धा आहेत. राष्ट्रकुल खेळ (Commonwealth Games) आणि आशियाई खेळांसाठी आम्ही हळूहळू शीर्षस्थानी येण्याचा प्रयत्न करू."

आर माधवनच्या मुलाने चमत्कार केला

वेदांत माधवननेही स्पर्धेत सकारात्मक सुरुवात केली, त्याने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आणि पुरुषांच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. भारतीय अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांतने 10 जलतरणपटूंच्या (Swimmers) अंतिम फेरीत 15.57.86 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. आपल्या मुलाच्या या यशाबद्दल आर माधवनने आनंद व्यक्त केला आहे.

मार्च 2021 मध्ये झालेल्या लॅटव्हिया ओपनमध्ये सोळा वर्षांच्या मुलाने कांस्यपदक जिंकले होते. त्याने गेल्या वर्षी ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सात पदके (चार रौप्य आणि तीन कांस्य) जिंकून छाप पाडली. महिलांच्या 400 मीटर मेडलेच्या बी फायनलमध्ये शक्ती बालकृष्णनने दुसरे आणि एकूण आठवे स्थान पटकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT