Tony Kakkar- Jasmin Wedding  Dainik Gomantak
मनोरंजन

Tony Kakkar- Jasmin Wedding video : टोनी कक्कर आणि जास्मिन भसीननं गुपचूप लग्न केलं ? व्हिडीओ आला समोर...

गायक टोनी कक्कर आणि जास्मन भसिन याचं लग्न झाल्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे.

Rahul sadolikar

Tony Kakkar and Jasmin Bhasin got married secretly? सध्या सोशल मिडीयावर एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा आहे नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर आणि जास्मिन भसिन यांच्या लग्नाची. जस्मिन भसीन आजकाल अनेक गाणी घेऊन येत आहे. तिने आपल्या गाण्यांनी लोकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, गायक टोनी कक्करही बऱ्याच दिवसांपासून कोणतंही गाणं घेऊन आलेला नाही, मात्र हे दोघेही गेल्या काही तासांपासून चर्चेत आहेत.

 कारण जस्मिन आणि टोनीची एक क्लिप समोर आली आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. हा त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ असून यामध्ये दोघेही लग्नाच्या मंडपात बसलेले आहेत. बॅकग्राउंडमध्ये एक गाणंही वाजतंय, ते टोनी कक्करचं नवीन गाणं आहे. या गोष्टीमुळे दोघांनी गुपचूप लग्न केले की काय अशी सोशल मिडीयावर अफवा निर्माण झाली आहे.

जास्मिन भसीन आणि टोनी कक्कर यांचा म्युझिक व्हिडिओ रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. बिग बॉस ब्युटीने आता तिच्या सोशल मीडिया हँडलवर फर्स्ट लूक पोस्टर देखील शेअर केला आहे आणि तो पहिल्या लूकमध्ये छान दिसत आहे. पोस्टरमध्ये दोघेही त्यांच्या रॉकिंग स्वॅग लूकमध्ये दिसत आहेत. 

 या व्हिडीओत टोनी भन्नाट दिसत आहे तर दुसऱ्या बाजुला जस्मिन भसीन लेहेंगा चोलीमध्ये ड्रॉप डेड गोर्जियस दिसत आहे. यात जस्मिन भसीन खूपच देखणी दिसत आहे. . पोस्टरवर 'शादी करोगी' असे लिहिले आहे. पोस्टरमध्ये दोघेही लग्न झाल्याच्या आनंदात दिसत आहेत.

दोघांनी आणखी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते लग्नाच्या मंडपात बसले आहेत आणि बॅकग्राउंडमध्ये टोनी कक्करचे नवीन गाणे वाजत आहे. दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. 

तिच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे की तिने गुपचूप लग्न केले आहे पण तसे काही नाही. दोघेही त्यांच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करत आहेत आणि तेही वेगळ्या पद्धतीने.

जस्मिन भसीनने तिच्या सोशल मीडियावर पहिले पोस्टर शेअर केले आणि लिहिले, 'या वर्षीचे लग्नगीत आले आहे.. डीआरजे रेकॉर्ड्स आणि राज जैस्वाल प्रेझेंट करत आहेत टोनी कक्करची शादी करोगी?'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विरोधी पक्षांचे नेते 'नर्व्हस' की 'ओवरकॉन्फिडेंट'? स्वार्थासाठी युती तोडली, भाजपला आयती संधी!

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

SCROLL FOR NEXT