Tiger Shroff is overwhelmed as Amitabh Bachchan tries to imitate his high kick  Dainik Gomantak
मनोरंजन

वयाच्या 79व्या वर्षी महानायक अमिताभ यांची 'टायगर' किक, फोटो व्हायरल

अमिताभ बच्चन सारख्या सिनेसृष्टीतील दिग्गजाने अ‍ॅक्शन क्षेत्रात टायगरचा प्रभाव असल्याचे मान्य केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिबूडचा सर्वात तरुण, मुलिंच्या मनात घर करणारा आणि सर्वात यशस्वी अ‍ॅक्शन स्टार, टायगर श्रॉफने (Tiger Shroff) अ‍ॅक्शन क्षेत्रात इतकी छाप सोडली आहे की, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सारख्या सिनेसृष्टीतील दिग्गजाने देखील अ‍ॅक्शन क्षेत्रात टायगरचा प्रभाव असल्याचे मान्य केला आहे.

दिग्गज सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन यांनी त्याच्या सोशल मीडियावर टायगर श्रॉफची खास अॅक्शन म्हणून ओळख असलेली स्टेप करण्याचा आणि त्याचे टायगरचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपले काही फोटो देखील शेअर केले आहेत. "टायगर श्रॉफला त्याच्या लवचिक किक मुळे 'लाइक' मिळत असल्याचे पाहून, काही 'लाइक्स' मिळण्याच्या आशेने मला वाटले की मी देखील असा काही प्रयत्न करून पहावा, असे मजेशीर कॅप्शन महानायकाने या पोस्टला दिले आहे.

हे पाहून भारावून गेलेल्या टायगर श्रॉफने मिस्टर बच्चन यांचे आभार मानले आणि सुपरस्टारच्या प्रेमळ शब्दांवर आनंद व्यक्त केला. जेव्हा आपल्या देशाचा महान स्टार आणि महान अ‍ॅक्शन हिरो माझ्यासाठी काही उदार शब्द गंभीरपणे बोलतता तेव्हा मला खूप भारावून येतं, काही वर्षांनंतरही मी तुमच्यासारखी लाथ मारू शकलो तर, तो एक माझ्यासाठी तुमचा आशीर्वाद असेल, अशी रिपोस्ट करत टायगरने अमिताभ यांचे आभार मानले.

दरम्यान, टायगर श्रॉफ सध्या त्याच्या बहुचर्चित चित्रपट हिरोपंती 2 च्या रिलीजसाठी तयारी करत आहे जो त्याच्या पहिल्या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीयांसाठी खास पर्वणी! प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्तींचा गोवा दौरा, वाचा सविस्तर माहिती

Margao: '..पुन्हा परीक्षा घ्या, अन्यथा नगरपालिकेचे काम रोखू'! मडगाव कर्मचारी भरती परीक्षेवरुन काँग्रेस, NSUI आक्रमक

Goa Coconut Price: गोमंतकीयांना दिलासा! नारळ, भाज्यांचे दर उतरले; 'फलोत्पादन'ने विकले 1 लाख नारळ

"हांव खरें तेंच उलायला", एका शब्दाने उडाला गोंधळ; तरीही मंत्री कामत शब्दावर 'ठाम'

Goa Census: गोव्यात 2 टप्प्यांत होणार जनगणना! पूर्णपणे डिजिटल पद्धतीचा वापर; ॲपद्वारे होणार घरांची नोंद

SCROLL FOR NEXT