Ganapath  Dainik Gomantak
मनोरंजन

टायगर श्रॉफच्या 'गणपत'मध्ये दिसणार बिग बींच्या या गाण्याचा रिमेक...

अभिनेता टायगर श्रॉफच्या आगामी गणपत या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन एका गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे.

Rahul sadolikar

Tiger Shroff Upcoming Film Ganpath : बॉलीवूडचा अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफ आता त्याच्या आगामी चित्रपट गणपतच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात टायगर त्याच्या नेहमीच्या अ‍ॅक्शन लूकमध्येच दिसणार आहेत.

टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटाची गेल्या काही दिवसापांसुन चर्चा सुरू आहे.

गणपतची अपडेट

'गणपत'च्या पोस्टरनंतर आता या चित्रपटाच्या गाण्यांबाबत संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे .

या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे एक प्रसिद्ध गाणे वापरण्यात येणार आहे. या गाण्या्च्या रिमेकची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे.

टायगर श्रॉफ (Tiger Shroff ) आणि क्रिती सेनॉनच्या 'गणपत' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. 

बहुप्रतिक्षित चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर सोमवारी रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये टायगर श्रॉफ त्याच्या भन्नाट स्टाईलमध्ये दिसत आहे. 

नवीन पोस्टरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली. आता चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे, जे त्याच्या गाण्यांशी संबंधित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे एक प्रसिद्ध गाणे वापरण्यात येणार आहे.

सारा जमाना

रिपोर्ट्सनुसार, 'गणपत'च्या निर्मात्यांनी 1981 मध्ये आलेल्या 'याराना' चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचे आयकॉनिक गाणे 'सारा जमाना' रिक्रिएट केले आहे. निर्मात्यांनी चित्रपटातील एका महत्त्वाच्या सिक्वेन्सवर त्याचा वापर केला आहे. 

चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी हे गाणे लाँच केले जाईल. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही मुख्य भूमिका आहे. आता ते गाण्यातही दिसणार का हे पाहणे बाकी आहे.

टायगरने रिलीज केले पोस्टर

गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी सोमवारी, टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पाच भाषांमध्ये 'गणपत'चे पोस्टर रिलीज केले. ऑफिशियल पोस्टरमध्ये टायगर श्रॉफची खास स्टाइल पाहायला मिळाली.

 पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन लिहिले, “बाप्पाचा हात असताना कोणाला काय थांबवणार. गणपत नवीन संसार सुरू करायला येतोय. या दसऱ्याला, 20 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये 'गणपत'.

गणपत 20 ऑक्टोबरला रिलीज होणार

चित्रपटाचा मुख्य नायक गणपतच्या निर्धाराची कहाणी यात दाखवण्यात येणार आहे. दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात टायगर श्रॉफ, कृती सेनन आणि हिमांशू जयकर प्रमुख भूमिकेत आहेत. 

'गणपत' हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. वृत्तानुसार, निर्माते येत्या काही आठवड्यांत 'सारा जमाना' च्या रिक्रिएट व्हर्जनसह चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी रिलीज करतील.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT