Parineeta - Raghav : नवरीच्या आधी घर सजुन तयार... 'परिणिता - राघव'च्या लग्नाची तयारी जोमात
Pareeniti Chopra - Raghav Chaddha Wedding Planning : आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्राच्या लग्नाच्या तयारीला सध्या जोर आला असुन दोघांची घरं रोशनाईने खुलली आहेत.
परिणितीच्या घराची झलक
परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा(Parineeti Chopra Raghav Chaddha ) यांच्या लग्नाची सोशल मिडीयावर जोरदार तयारी सुरू आहे. 23 सप्टेंबरला दोघेही एकमेकांचा हात कायमचा हातात घेणार आहेत.
साखरपुडा आटोपल्यानंतर आता खूप काळाच्या अंतराने दोघे बोहल्यावर चढणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आता लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन (Pre Wedding function) सुरू झाले आहे. लग्नाची तयारी जोमाने सुरू असताना आता परिणीती चोप्राच्या घराची झलक समोर आली आहे. तिचे घर एखाद्या वधूसारखे दिवे लावून सजवण्यात आले आहे.
आकर्षक रोशनाईने सजले परिणितीचे घर
चहूबाजूंनी रोषणाईने सजलेल्या परिणीतीच्या घराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये दोघेही त्यांच्या मेहंदी सोहळ्याची तयारी करताना दिसत आहेत.
उदयपूरमध्ये पार पडणार लग्न
परिणिती आणि राघव चढ्ढा यांचं लग्न मुंबईत होणार नाही तर उदयपूरमध्ये होणार आहे. 23 आणि 24 सप्टेंबर रोजी हॉटेल लीला पॅलेसमध्ये त्यांच्या लग्नाचे जवळपास सर्व कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
मात्र, राघव आणि परिणीतीच्या लग्नाचे काही विधी दिल्लीतही पार पडतील, त्यातील एक मेहंदी सोहळा असेल.
या लग्नाच्या तयारीची झलक आता समोर येऊ लागली आहे. राजकारणी आणि अभिनेत्रीचा मिलाप घडवणाऱ्या या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वत्र सुरू आहे.
24 सप्टेंबरला वाजणार सनई
दोघांच्या लग्नाआधीची सुरुवात अरदास-कीर्तनाने झाली. 24 सप्टेंबरला 'द लीला पॅलेस'मध्ये पंजाबी रितीरिवाजानुसार त्यांचे लग्न होणार असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर 30 सप्टेंबरला 'ताज लेक' येथे रिसेप्शन पार्टी होणार आहे.
अशीही बातमी आहे की राघव चड्ढा त्याची नववधू परिणीती चोप्राच्या लग्नाची मिरवणूक शाही बोटीने घेऊन जाणार आहे आणि तिच्यासोबत बोटीने परतणार आहे. साहजिकच हे लग्न शाही थाटातच पार पडेल यात शंका नाही.