Teacher’s Day 2021 Dainik Gomantak
मनोरंजन

Teacher’s Day 2021: 'हे' चित्रपट शिक्षक आणि विद्यार्थी निर्मळ नात्याला उलघडतात

बॉलीवूडमध्येही (Bollywood) असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे शिक्षकांच्या प्रेम आणि समर्पणावर आधारित आहेत.

दैनिक गोमन्तक

देशभरात आज शिक्षक दिन (Teacher’s Day 2021) उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांचे महत्त्व सांगितले जात आहे. बॉलीवूडमध्येही (Bollywood) असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे शिक्षकांच्या प्रेम आणि समर्पणावर आधारित आहेत. या यादीमध्ये 'तारे जमीन पर', हीचकीसह अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

Hichki movie

'हिचकी' चित्रपटात राणी मुखर्जीने नैना मधुर नावाच्या शिक्षिकेची भूमिका साकारली होती जी टॉरेट्स सिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रस्त असते. या आजारामुळे नैनाला बोलण्यात अडचण येते. अनेक शाळांमध्ये नाकारण्यात आल्यानंतर अखेर नैनाला एका शाळेत नोकरी मिळाली. मुलेही नैनाच्या आजाराची खिल्ली उडवतात. आता यात दाखवण्यात आले आहे की, नैना मुलांना कशी सांभाळते आणि तिच्या समस्यांना सामोरे जाते यामधील प्रत्येक गोष्ट कशी हाताळते.

Stanley Ka Dabba movie

'स्टेलनी का डब्बा' हे चित्रपट अमोल गुप्ते यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केले आहे. स्टेलनीची कथा यात दाखवण्यात आली आहे, जी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आवडते. पण त्याच शाळेत एक शिक्षक आहे जो इतरांचे डब्बे खाण्याचा शौकीन आहे. एक दिवस स्टेलनी त्याच्या डब्बा घेयला विसरतो आणि मग शिक्षक त्याला वर्गाच्या बाहेर काढतात. या वादाच्या भोवऱ्यात असे एक सत्य समोर येते की सर्वांनाच धक्का बसतो.

Black movie

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ब्लॅक चित्रपटात राणी मुखर्जीने एका अंध मुलीची भूमिका साकारली होती, जिचे तिच्या शिक्षकाशीही नाते आहे. या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले होते.

Iqbal movie

नागेश कुकनूरचा चित्रपट इकबाल दाखवतो की एक कर्णबधिर आणि इकबाल भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात सामील होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसे अडचणींना तोंड देत होता. इक्बालची व्यक्तिरेखा श्रेयस तळपदेने साकारली आहे. इक्बालला त्याच्या प्रशिक्षकाचा पूर्ण पाठिंबा होता, ज्याची भूमिका नसीरुद्दीन शाहने साकारली होती. हा चित्रपट शिक्षक दिनासाठी योग्य आहे.

Taare Zameen Par movie

तारे जमीन पर चित्रपटात अभिनेता दर्शील सफारीने ईशान अवस्थीची भूमिका साकारली होती. आमिर खान दिग्दर्शित या चित्रपटाची कथा अमोल गुप्ते यांनी लिहिली आहे. चित्रपटाची कथा एका 8 वर्षांच्या मुलाची आहे जो डिस्लेक्सिया नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना अभ्यास करणे कठीण जाते. ईशानचे आईवडील त्याला समजत नाहीत, पण नंतर निकुंभ अर्थात आमिर खान त्याच्या आयुष्यात येतो. निकुंभ ईशानला मदत करतो आणि त्याची प्रतिभा सर्वांसमोर आणतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT