Tamanna Bhatia Dainik Gomantak
मनोरंजन

Tamanna Bhatia : जेव्हा तमन्नाचे फोटो एका प्रसिद्ध बार गर्लच्या नावाने फिरत होते...काय होता हा किस्सा?

हा काळ तेव्हाचा होता जेव्हा तमन्नाच्या करिअरची नुकतीच सुरूवात झाली होती.

Rahul sadolikar

सध्या अभिनेत्री तमन्ना भाटियाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे. तमन्ना आणि अभिनेता विजय वर्मा यांच्यातल्या नात्याबद्दल सोशल मिडीयावर बऱ्याच चर्चा सुरू होत्या, जेव्हापासुन तमन्नाने विजय वर्मासोबतच्या नात्यावर कबूली दिली त्या दिवसापासुन सोशल मिडीयावर तमन्नाच्या फॅन्सच्या उत्साहाला उधाण आलं आहे.

आज तमन्ना साऊथ आणि हिंदी चित्रपटातलं एक महत्त्वाचं नाव बनली आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तमन्नाच्या नावाची चर्चा एका वेगळ्याच कारणासाठी होत होती. एकेकाळी तमन्नाचं नाव मुंबईतल्या एका प्रसिद्ध बारगर्लच्या नावासोबत जोडलं गेलं होतं. तमन्नासाठी ही एक धक्कादायक गोष्ट होती. काय होता हा किस्सा चला जाणुन घेऊया.

तरन्नुम खान आणि तमन्ना

तेलुगू चित्रपट अभिनेत्री तमन्नासाठी 2005 साल हे करिअरच्या सुरूवातीच्या वर्षांपैकी एक महत्त्वाचं वर्ष होतं. तमन्नाचा बॉलीवूडमधला पहिला चित्रपट रिलीज झाला होता आणि हळूहळू लोक तमन्नाला ओळखायला लागले होते. आणि अचानक काही फोटो ईमेलवरुन विचित्र कॅप्शनसह फिरायला लागले.

या फोटोंमध्ये दावा केला होता "आता तुम्हाला समजले आहे की इतके क्रिकेटर्स आणि चित्रपट कलाकार तिच्यासाठी वेडे का आहेत?"; "हो ती तरन्न्नुम खान आहे, आजकाल प्रसिद्ध बार गर्ल आहे." चांद सा रोशन चेहरा या हिंदी चित्रपटात काम केलेली आणि आता प्रसिद्धीस आलेली तमन्ना म्हणजे मुंबईत प्रसिद्ध असलेली बारगर्ल तरन्नुम खान आहे अशी अफवा त्या काळात जोर धरु लागली होती. या अफवेने तमन्ना आणि तिच्या घरच्यांना डोकं धरायला लागलं होतं.

माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही मॅसेज

या प्रकारानंतर तमन्नाने प्रतिक्रिया देताना म्हटले होते "सट्टेबाजीच्या व्यवसायाच्या आरोपांमुळे नुकतीच अटक करण्यात आलेल्या वादग्रस्त बार डान्सरसोबत माझे नाव जोडण्यात आल्याचे मला कळले तेव्हा मला धक्का बसला,"

तिने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना पुढे सांगितले होते. "मला माझ्या नातेवाईक आणि मित्रांकडून अनेक कॉल येत आहेत. माझ्या बऱ्याच मित्रांना आणि नातेवाईकांनाही अशाच मी आणि ती बार डान्सर एकच आहोत अशा आशयाचे मॅसेज गेले आहेत".

तमन्ना म्हणाली हे फोटो...

तमन्नाने त्यावेळी हा दावा केला होता की तिच्या 'चांद सा रोशन चेहरा' या चित्रपटातील काही फोटो चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केले गेले. श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुतय्या मुरलीधरन आणि अभिनेता आदित्य पंचोली यांच्यासह अनेक प्रमुख लोकांची नावे बार डान्सर तरन्नुम खान हिच्याशी जोडली गेली होती.

तरन्नुम खानची नावं थेटपणे ज्यांच्याशी जोडली त्या क्रिकेटर आणि फिल्म स्टार्स यातल्या कुणाचीही तेव्हा इतकी चर्चा झाली नव्हती जेवढी तमन्नाची झाली होती. सायबर प्रँकस्टर्सनी तमन्नाचे फोटो व्हायरल करुन तिला मनस्तापच दिला होता.

तमन्नाचे वडील म्हणाले होते

तमन्नाचे वडील संतोष भाटिया यांनी मुंबईतील या वृत्तपत्राला सांगितले होते की, त्यांनी मुंबईतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. "हे सर्व कोण करत आहे हे आम्हाला माहीत नाही. माझ्या मुलीला मानसिक आघात झाला आहे आणि ती तिच्या अभिनयावर लक्ष केंद्रित करू शकत नाही,".

मुंबईच्या अंधेरीच्या लोखंडवाला येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या तमन्नाने तेव्हा नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT